बस स्थानकाचे फलक लागले पण तिकिटावरील औरंगाबाद नाव कधी जाणार ? तुषार विव्दंस

बस स्थानकाचे फलक लागले पण तिकिटावरील औरंगाबाद नाव कधी जाणार ? तुषार विव्दंस

The bus station boards are up but when will the Aurangabad name on the ticket go? Tushar Vivdans

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 30 March23 ,18.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : औरंगाबाद बसस्थानकावर झळकले छत्रपती संभाजीनगर; शासनाच्या अधिसूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला निर्णय मात्र एसटी बसच्या तिकिटावर मात्र आजही औरंगाबाद असाच उल्लेख आहे. त्यामुळे तिकिटावरील औरंगाबादचे नाव कधी जाणार ? असा प्रश्न  कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार विव्दंस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून विचारला आहे याबाबतचे निवेदन  कोपरगाव आगारप्रमुख अमोल बनकर यांना  देण्यात आले आहे

केंद्र सरकारने हिरवा झेंडा दिल्यानंतर 
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ घोषित करण्यात आले आहे. या निर्णयानुसार एसटी महामंडळाने २८ फेब्रुवारी रोजी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी मध्यवर्ती बस स्थानकावर छत्रपती संभाजीनगर आणि मध्यवर्ती बस स्थानक उस्मानाबादचे नाव धाराशिव बस स्थानक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार  जेथे जेथे जुने नाव आहे. त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्याबाबत आदेश देण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे नाव छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बसस्थानक करण्यात आले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यशाळा, छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यशाळा, छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालय असे नावाचे फलक लावण्यात  आले आहे.असे निवेदनात म्हटले आहे
मी कोपरगाव  रहिवासी असून मी सोमवारी (२७)  मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी   बस मध्ये बसलो ही  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची कोपरगाव  आगाराची  साधी बस होती नियमाप्रमाणे मी  छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी बसवाहकाकडे एक तिकीट मागितले मी तिकीट काढल्यानंतर त्या तिकिटावर कोपरगाव औरंगाबाद असा उल्लेख आढळून आला. बस स्थानकाचे नाव बदलले  एसटीचे फलक बदलले परंतु आंत तिकिटावर मात्र औरंगाबादच राहिले त्यामुळे मला मोठा धक्का बसला. हा जनतेच्या  भावनांचा अपमान आहे. येत्या आठ दिवसात कोपरगाव आगाराच्या एसटी बस तिकिटावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख आला नाही तर  या निषेधार्थ  विना तिकीट प्रवास करून  आंदोलन करू  असा इशारा निवेदनातून  देण्यात आला आहे या निवेदनावर  तुषार विद्वंस  , सुनील फंड, संतोष गंगवाल,  अनिल गायकवाड योगेश गंगवाल आदींच्या सह्या आहेत. 

कोट

याबाबत कोपरगाव बस आगाराचे  प्रभारी  आगारप्रमुख अमोल बनकर यांच्याशी संपर्क  होऊ शकला नाही  डेपो आगाराचे वाहतूक नियंत्रक  अविनाश गायकवाड यांच्याबाबत यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले,  एसटीच्या सर्व   बसेसच्या तिकिटावर  औरंगाबाद ऐवजी आता छत्रपती संभाजीनगर  करण्यात आले आहे  परंतु  कोपरगाव वैजापूर मार्गे  छत्रपती संभाजीनगर जाणारी बस  नियोजित रस्ता खराब असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी  वेगळ्या मार्गाने जात असल्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे तिकिटावर  नाव  बदल होत नाही लवकरच याबाबत  वरतून दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.                                 

Leave a Reply

You cannot copy content of this page