कोपरगाव शहर विकासासाठी सव्वासात कोटीचा मोठा निधी ; स्नेहलता कोल्हे यांचे विशेष प्रयत्न
A huge fund of 7.27 crores for the development of Kopargaon city; A special effort by Snehalata Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon3 April23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शासनाने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा वेगवेगळ्या योजनांतर्गत जिल्हा स्तर योजनेतून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, गटारी, पेव्हर ब्लॉक आदी कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.
शहरातील कामांना निधी मिळावा यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे.
याबद्दल माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांचे आभार व्यक्त केले आहे शहरातील कामे होणार असल्यामुळे नागरिकात आनंद व्यक्त होत आहे
Post Views:
107