उभ्या स्कूल बसमधून भरबाजारात डिझेलची चोरी; दोन जणांना अटक
Theft of diesel fuel from standing school buses; Two people were arrested
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun2 April23 ,19.30 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: तालुक्यातील कोळपेवाडी येथील सिद्धेश्वर पतसंस्थेच्या समोर भर बाजारात उभे असलेल्या स्कूलबस मधून डिझेल चोरी केलेल्या दोन जणांना कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी १० हजाराच्या मुद्देमालाचे अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कोळपेवाडी येथील सिद्धेश्वर पतसंस्थेच्या समोर भर बाजारात उभे असलेल्या स्कूलबस एम एच १७ बी. वाय. ९३२८ मधील ६९००/- रु किमतीचे ७५ लिटर डिझेल हे कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेले असल्याची फिर्याद चांगदेव साहेबराव कदम (४५) कोपरगाव ग्रामीण पोलिसात दिली होती पोलीस स्टेशन गुरजि नंबर १६२/२०२३ भादवि कलम ३७९,४११,३४ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, आरोपी अमोल अविनाश कुंदे (१९) राहणार एकरुखे तालुका राहता याचा शोध घेतला असता त्याने रवींद्र उर्फ भगवान भिकाजी भातकुटे (३५) भातकुटे वस्ती तालुका राहता याला विकली असल्याचे सांगितले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ९७०६ रुपयांचे १०५ लिटर डिझेल असलेले तीन निळे ड्रम पोलिसांना काढून दिले
पोलीस अधिक्षक राकेश ओला. अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले पोलीस निरीक्षक तुषार धाकराव, पोलीस उपनिरीक्षक विलास कोकाटे, पो.ना. किसन सानप, पोकॉ रशिद शेख, एस. डीपीओ सो शिर्डी पोहेकॉ इरफान शेख, पोना कृष्णा कु-हे,पोना शिंदे यांनी केली आहे. सदर आरोपींनी अशाच प्रकारचे चोरीचे गुन्हे केले आहे अगर कसे पुढील तपास पोलीस कसोशीने करत आहेत.
Post Views:
217