शासकीय कार्यालयांना महावितरणचा झटका; कोळपेवाडी तलाठी कार्यालयाची वीज तोडली
Mahadistrivan hit to government offices; Kolpewadi Talathi office power cut
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon3 April23 ,16.10 Pm By राजेंद्र सालकर
कार्यालयात अंधार, २७ हजार ३५० ची थकबाकी, जोर धक्का धीरे से लगा Darkness in the office, dues of 27 thousand 350, jor jak dheere se laga
कोपरगाव :- वीज बिल थकविणाऱ्या शासकीय कार्यालयांना महावितरण कंपनीने झटका दिला आहे. कोळपेवाडी बाजार तळ येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचे २७ हजार ३५० रुपये वीज बिल थकले आहे. याबाबत १५ दिवसाची आगावू नोटीस देऊन देखील बील न भरल्याने महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा वीस दिवसांपूर्वी खंडित केला आहे. मात्र तलाठी प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे पंधरा दिवसानंतर त्यांना हा विजेचा जोर का धक्का धीरे से लगा त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना अंधारात बसण्याची आणि मोबाईल टॉर्चचा (बॅटरी) वापर करून काम करण्याची वेळी आली.
महावितरण कंपनीने वीज बिल थकविणाऱ्या ग्राहकांविरोधात जोरदार मोहिम आखली आहे. त्यानुसार नोटीस बजावूनही वीज बिल न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई करत वीज जोडणी तोडली जात आहे. याबाबत महावितर कंपनीने त्यांना नोटीन देऊन १५ दिवस आगावू सूचना दिली होती. तरीही वीज बिल न भरल्यामुळे अखेर महावितरणने
कोळपेवाडी बाजार तळ येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
कोळगाव थडी शहाजापुर सुरेगाव कोळपेवाडी चार गावचा कारभार या मंडला अंतर्गत १७ गावचे कामकाज चालते एक वर्षा पासून कोळपेवाडी महावितरण कंपनी चे मार्च अखेर सदर कार्यालयाकडे २७ हजार ३५० विज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनी ने २० दिवसापासून विज पुरवठा खंडित केल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला १५ दिवसापासुन ट्रेनिंग साठी गेलेले कामगार तलाठी हे सोमवारी सकाळी दहा वाजता कार्यालयात हजर झाले भाऊसाहेबाभोवती नागरिक व शेतकरी यांनी दाखले व प्रलंबित कामसाठी गराडा घातला उता-याची प्रिंट आउट निघत नसल्याने विजेची चौकशी कामगार तलाठी खैरनार यांनी केली असता महावितरण कंपनी कडुन विज पुरवठा खंडित करण्यात आल्याचे उत्तर मिळाले. त्यामुळे तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली असून अनेकांची ऑनलाईन कामे खोळंबली आहेत. कार्यालयातील कर्मचारी मोबाईलवर व मेणबत्तीच्या उजेडात काम सुरू केले आहे.
कामगार तलाठी कार्यालया कडुन मार्च अखेर २० लाखाचा महसूल महाराष्ट्र शासनास वसुल झाला त्या कार्यालयाचे विज बिल एक वर्षांपासून भरले न गेल्यामुळे विज कट होण्याची नामुष्की महसुल विभागावर ओढावली शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशा म्हनिचा प्रत्यय खुद्द कामगार तलाठी यांना आल्याने त्यांनी वरिष्ठांना खंडित विज पुरवठ्याची कल्पना देवुन कार्यालयातुन काढता पाय घेतला .
Post Views:
263





