कोपरगावकरांना लाफ्टरचा बूस्टर डोस ;  “महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” मनोरंजनाची मेजवानी

कोपरगावकरांना लाफ्टरचा बूस्टर डोस ;  “महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ” मनोरंजनाची मेजवानी

A booster dose of laughter to Kopargaoners; “The laughter of Maharashtra” is a feast of entertainment

निमित्त : कर्मवीर शंकरराव काळे यांची १०२ व्या जयंतीOccasion: 102nd birth anniversary of Karmaveer Shankarao Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue4 April23 ,17.10 Pm

कोपरगाव : गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं आहे. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखला जाणा-या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मंचाने सोमवारी(दि ३) रोजी सायंकाळी कोपरगावकरांना खळखळून हसवलं. जोडीला गाण्यांची मैफील व नृत्याविष्कार या तीन तासांच्या कार्यक्रमातून  कोपरगावच्या रसिकांना निखळ आनंद दिला आहे.

कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त पंचायत समिती प्रांगणातील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पूजन करण्यात आले आ. आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. २०१८ साली सुद्धा  सुपर डुपर हिट असलेला ‘चला हवा येऊ द्या’ हा  विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या दोन्हीहीकार्यक्रमांनी गर्दीचे उच्चांक मोडले. 
सोमवारी सायंकाळी तहसील कार्यालय मैदान गर्दीने फुलून गेले होते. सुप्रसिद्ध विनोदी कलाकार समीर चौगुले, चेतना भट, प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे/संबेराव, वनिता खरात, रोहित माने (सावत्या) यांचे उत्तम अभिनय, खुमासदार विनोद, नव्या पिढीचे सुप्रसिद्ध गायक अंजली गायकवाड, चैतन्य देवरे यांच्या सुरेल आवाजातील गाणी व त्या जोडीला सिनेस्टार, सुप्रसिद्ध नृत्यांगना, रील स्टार माधुरी पवार हिच्या बहारदार नृत्याने कोपरगावकरांची मने जिंकून घेतली. ठसकेबाज लावण्यांवर देखणा नृत्याविष्कार व विनोदाच्या हास्याचे फवारे गेला कोपरगावच्या रसिक प्रेक्षकांनी शिट्ट्या व टाळ्या वाजवून भरभरून दाद दिली. 
यावेळी  हास्यजत्रेत माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे, आ. यशवंत माने, लातूरचे राहुल केंद्रे, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ. निलेश लंके, आ. किरण लहामटे, बाबुराव पाटील कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील, मा.आ.भानुदास मुरकुटे, भीमाशंकर  कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे, संतोष माने, डॉ.सुगत चंद्रिकापुरे आदी मान्यवरांसह माजी आमदार अशोक काळे, सौ. पुष्पाताई काळे, सौ.चैताली काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे आजी, माजी संचालक, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . 
यावेळी आ निलेश लंके म्हणाले   पारनेरचे आमदार म्हणून काम करताना कर्मवीर शंकरराव काळे यांनी अनेकांना रयत सेवेत नोकरीला लावून कोपरगावबरोबर पारनेरचा ही संसार उभा केला ते केवळ कोपरगावचेच नव्हे तर पारनेरचे देखील आधारस्तंभ होते अशा शब्दात कर्मवीर काळे यांचा गौरव केला.  
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर झाडबुके, चैत्राली जाधव यांनी केले.  काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी आभार मानले
     

चौकट :- माझ्या दादा बाबांच्या आदर्श वाटचाल करताना माजी आमदार अशोक काळे यांची विकास कामे ते प्रति असलेली बांधीलकी आणि योगदान या  निस्वार्थी  समाजसेवेमुळे मला कोपरगावच्या जनतेने आमदारकी दिली धुळगाव ही ओळख बदलण्याचा  विकासासाठी लढण्याचा निश्चय केला. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना महाविकास आघाडीने पंधराशे कोटी निधी दिला  सरकार बदलल्यानंतर देखील ५५० कोटी असा जवळपास दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मतदार संघासाठी मिळाला  त्यामुळे  शहरासह ग्रामीण भागातील रस्ते वीज पाणी हे प्रश्न बहुतांशी सुटले.शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार असून नागरिकांना नेहमीच स्वच्छ पाणी मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिले. मला साथ द्या असे आवाहन त्यांनी शेवटी केले

Leave a Reply

You cannot copy content of this page