कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची पहिली भूमिका : काळे -कोल्हे
Our first position is that Kopargaon Agricultural Produce Market Committee election should be unopposed: Kale-Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed19 April23 ,17.20 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव :शेतकऱ्यांच्या हितासाठी व कोपरगाव बाजार समितीच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करावी ही भूमिका काळे- कोल्हे यांच्या तिस-या पिढीत कायम असून आ आशुतोष काळे व जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे यासाठी प्रयत्नरत असून त्यांना मोकळया मनांने साथ द्यावी असे आवाहन नितीन औताडे, साहेबराव रोहोम, खंडेराव फेफाळे व माधवराव खिलारी यांनी संयुक्तरित्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
भले आपले कितीही राजकारण असले तरी ते आपापल्या ठिकाणी पण शेतक-यांच्या उन्नतीसाठी राजकीय जोडे बाजुला ठेवुन कार्यरत रहायचे हा कर्मवीर स्व. शंकरराव काळे व माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा मुलमंत्र दुस-या पिढीतही माजी आमदार अशोक काळे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे जपला व त्यांनी कोपरगांव बाजार समितीची निवडणुक पुढाकार घेत नितीन औताडे व राजेश परजणे गटाच्या मदतीने आजवर बिनविरोध घडविल्या आहेत, चालु पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध करण्यांसाठी आमदार आशुतोष काळे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे ही निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नास नितीन औताडे व राजेश परजणे गटाचे ही गटाची ही सकारात्मक भूमिका आहे असल्याचे पत्रकार नमूद केले आहे.
कोपरगांव बाजार समितीत पहिले अडीच वर्षे कोल्हे गटाचा सभापती तर काळे गटाचे उपसभापती व नंतरच्या अडीच वर्षात काळे गटाचा सभापती तर कोल्हे गटाचे उपसभापती कारभार पाहणार आहेत. ही निवडणुक बिनविरोध घडविण्यांत सर्वच तोलामोलाचे उमेदवार साथ देत आहेत. त्यामुळे आता अपक्ष उमेदवारांनी मोठ्या मनाने बिनविरोध निवडणुकीसाठी साथ द्यावी असे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे
आज गुरुवारी (दि.20) माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे या आवाहनास प्रतिसाद मिळून निवडणूक बिनविरोध होणार की, निवडणूक होणार हे दुपारी 3 वाजता माघारी नंतर स्पष्ट होईल परंतु आजवरचा इतिहास पाहता निवडणूक बिनविरोधच होईल असे वाटते.
Post Views:
173