कोपरगाव बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव उधळला; 3 जागा बिनविरोध, आता 15 जागेसाठी 38 उमेदवार रिंगणात 

कोपरगाव बाजार समिती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रमुख पक्षांचा डाव उधळला; 3 जागा बिनविरोध, आता 15 जागेसाठी 38 उमेदवार रिंगणात 

Kopargoan Market Committee Election Major parties’ plan to go uncontested failed; 3 seats unopposed, now 38 candidates for 15 seats

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu20 April23 ,18.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : भाजपशी (कोल्हे गट) हातमिळवणी राष्ट्रवादी (काळे गट) यांनी नेहमीप्रमाणे राजेश परजणे व नितीन औताडे यांना बरोबर घेऊन निवडणुका बिनविरोध करण्याचा चालविलेला डाव हाणून पाडत उध्दव ठाकरे शिवसेना, काँग्रेस व  इतर अपक्षांनी उधळून लावल्याचे दिसत आहे.

माघारी नंतर 18 जागेपैकी तीन उमेदवार बिनविरोध झाल्याने उर्वरित 15 जागेसाठी 38 उमेदवार रिंगणात  असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली

माघारी नंतर चित्र स्पष्ट झाले असून बाजार समितीसाठी तब्बल उमेदवार रिंगणात उतरले आहेत निवडणूक रणसंग्रामात उतरण्यासाठी पदाधिकारी निवडणुकीवर ठाम;असुन त्यांनी परिवर्तनाचा सूर लावला आहे. मात्र अनेकांनी बिनविरोध निवडणुका होवू नये म्हणून तर काहींनी आपल्या पक्षाने घेतलेल्या मोजक्या जागांमध्ये बिनविरोध उमेदवार म्हणून संधी का देत नाहीत? म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडणुका तर अटळ दिसत आहेत.
       गुरुवारी(दि20) माघारीनंतर    सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण 7 जागेसाठी 16 उमेदवार रिंगणात सर्वसाधारण महिला राखीव  2 जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात    सोसायटी मतदार संघ इतर मागास वर्ग  1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात सोसायटी मतदार संघ भटक्या विमुक्त भटक्या जाती विमुक्त जमाती  1जागा 1 उमेदवार रामदास भिकाजी केकान बिनविरोध
ग्रामपंचायत मतदार संघ 2 जागेसाठी 4 उमेदवार रिंगणात ग्रामपंचायत मतदार संघ दुर्बल घटक 1 जागा 1 उमेदवार नवले अशोक सोपान बिनविरोध, 
ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जमाती 1 जागा 1 उमेदवार मोकळ रावसाहेब रंगनाथ बिनविरोध,
 व्यापारी मतदारसंघ 2 जागेसाठी 8 उमेदवार रिंगणात, हमाल मापाडी मतदारसंघ 1 जागेसाठी 3 उमेदवार रिंगणात  आहेत 18 जागेंसाठी होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित  15 जागेसाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत 
            सोसायटी मतदारसंघातून 1413 ग्रामपंचायत मतदार संघातून 779 व्यापारी मतदारसंघातून 198 तर हमाल मापाडी मतदारसंघातून 86 असे एकूण 2476 जणांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 
गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीची निवडणूक झाली नाही.
यापूर्वी  काळे, कोल्हे,परजणे व औताडे  यांनी एकत्र येत कोपरगाव बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध केल्या होत्या. त्यानंतर पावणेदोन वर्ष बाजार समितीवर  प्रशासक राज होते. मात्र यंदा निवडणुक  होत आहे. बाजार समिती निवडणूक सर्वांसाठी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती  या निवडणुकांची रंगीत तालीम असणार आहे. कुठल्याही परिस्थितीत ते ही बाजार समिती हातची जाऊ देणार नाहीत.त्यामुळे मतदाराच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
आज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक सन 2023 ते 2028 माघारी नंतर शिल्लक राहिलेल्या नामनिर्देशनपत्राची यादी कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय सर्वसाधारण मतदार संघ अर्ज 16 (10 शेतकरी) साहेबराव लामखडे, साहेबराव रोहम, विष्णु पवार, किरण चांदगुडे, धनराज पवार, लक्ष्मण शिंदे, विजय जाधव, रंगनाथ गव्हाणे, शिवाजी देवकर, कैलास आसण, संजय शिंदे, रावसाहेब टेके, गोवर्धन परजणे, देवराम हेगडमल, राहुल गवळी, बाळासाहेब गोर्डे कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय सहकारी संस्था महिला राखीव अर्ज 4 (3 शेतकरी) मिरा कदम, हिराबाई बारहाते, गयाबाई जावळे, माधुरी डांगे. कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय इतर मागासवर्ग मतदार संघ 3 अर्ज. (2 शेतकरी) गिरीधर पवार, खंडू फेफाळे, दत्ता बिडवे कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशिय भटक्या जाती विमुक्ती जमाती मतदार संघ 1 रामदास केकाण ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण 4 अर्ज (3 शेतकरी) संजय दंडवते, प्रकाश गोर्डे, विष्णु पाडेकर, राजेंद्र निकोले ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिदृष्टया दुर्बल घटक 1 अर्ज अशोक नवले ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती जाती 1 अर्ज रावसाहेब मोकळ व्यापारी अडते मतदार संघ अर्ज 8 सुनिल काठारी, ललित धाडीवाल, ऋषिकेश सांगळे, संजय भट्टड, मनिष शहा, अहमद नजिम, संतोष ठक्कर, रेवनननाथ निकम हमाल मापाडी मतदार संघ अर्ज 3 जलदिप शेळके, अर्जुन मरसाळे, रामचंद्र साळुंके सहाय्यक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नामदेव ठोंबळ हे कामकाज पहात आहेत
कोपरगाव बाजार समिती निवडणुकीच्या राजकारणात उध्दव ठाकरेंची शिवसेना काॅंग्रेस अपक्ष जाेमात  असून ,  उद्धव ठाकरे शिवसेनेचे 7  उमेदवार रिंगणात आहेत  काँग्रेसचे 3 उमेदवार रिंगणात आहेत.तर अपक्ष 13 उमेदवार रिंगणात आहेत असून व काँग्रेस  युतीचा पॅनल करणार असल्याचे  एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले काही अपक्ष उमेदवार ही आमच्या संपर्कात असून  त्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले, संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला दोन जागा दिल्याचे त्यांनी सांगितले.  शिवसेना काँग्रेस पॅनल साठी  जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे शहर प्रमुख सनी वाघ विधानसभा संघटक असलम शेखमाजी शहरप्रमुख भरत मोरे व शिवसेनेचे इतर पदाधिकारी प्रयत्न करत आहे

चौकट

 कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत  महाविकास आघाडीत  बिघाडी झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला व काँग्रेसला  राष्ट्रवादीने  डावलल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेना व काँग्रेस कडून करण्यात येत आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page