कार्यकर्त्यांच्या सोयीसाठीच आजपर्यंत कोपरगाव बाजार समितीची निवडणूक बिनविरोध – प्रमोद लबडे
Election of Kopargaon Bazar Committee unopposed till date only for the convenience of workers – Pramod Labade
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,18.50 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शेतकऱ्यांचा पैसा वाचविण्याच्या नावाखाली गेली 15 वर्ष कोपरगाव बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध केली ती शेतकऱ्यांचा पैसा वाचविण्यासाठी नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी केली असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांनी वारी येथे केले. अध्यक्षस्थानी रावसाहेब टेके होते.
यावेळी काँग्रेस तालुका प्रमुख आकाश नागरे, तुषार पोटे, नितीन शिंदे उमेदवार संतोष ठक्कर सुनील कोठारी माजी शहरप्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक असलम शेख उपस्थिती होते,
लबडे पुढे म्हणाले की, 1980, 90 च्या दशकात महाराष्ट्र अग्रेसर असलेली भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली बाजार समिती हळूहळू उध्वस्त झाली. उप बाजार समिती राहत्यात ही मुख्य बाजार समिती वर्ग करण्यापर्यंत वेळ आली. याला जबाबदार कोण? शेतकरी असो की व्यापारी यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण बाजार समितीकडून दिले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनु अडचणीतआल्याची अशी टीका प्रमोद लबडे यांनी केली.
यावेळी रावसाहेब टेके म्हणाले की, आज कोपरगाव बाजार समितीवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नसल्यामुळे शेतकरी आपला माल विंचूर, लासलगाव, बसवंत पिंपळगाव, वैजापूर, राहता बाजार समितीकडे कोणामुळे वळला याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच ही निवडणूक होत असून, सामान्य जनता या निवडणुकीत परिवर्तन करील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी परिवर्तन पॅनलचे संजय दंडवते, रंगनाथ गव्हाणे, गयाबाई जावळे, विष्णुपंत पाडेकर तसेच पोपटराव गोर्डे, अशोकराव कानडे,गोरख टेके, मच्छिंद्र नवले, बाबासाहेब वारकर तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views:
202