आपल्या बातमीचा इफेक्ट; कोपरगाव गोदावरी नदीतील मासे का मेले ? प्रदूषण महामंडळाकडून तपासणी
the effect of your news; Kopargaon Godavari river fish died? Inspection by Pollution Control Board
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,18.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील गोदावरी नदीत साठलेल्या पाण्यात आज मीतीस हजारो, लाखो मासे मयत झाले होते. नदीपात्रात अक्षरशः मयत माशांचा खच पडला होता. हे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात वाढ झाल्याचे चिन्ह आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी , असे वृत्त दैनिक पुण्यनगरी व दैनिक सामना मध्ये 14 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदूषण महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथे येऊन मयत माशांची पाहणी केली होती. त्यामुळे आता त्याचा अहवाल कधी येणार व या प्रश्न कोणावर कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
त्यामुळे या परिसरात दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर पसरली होती. ही बाब काही पर्यावरण प्रेमीं च्या लक्षात आली, त्यामुळे कोपरगावकर आता भर उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे. यावर नियंत्रण ठेवणारे प्रदूषण महामंडळ नेमके काय काम करीत आहे असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. हे मासे कशामुळे मेले प्रदूषण रोखण्यासाठी हे मंडळ नेमके कोणते काम करीत आहे असा सवाल विचारला जात आहे. गोदावरीच्या साठलेल्या पाण्यात अक्षरशः गटार गंगेचे स्वरूप आले आहे. पाणी काळपट हिरवेगार दिसत आहे त्यावर त्या पाण्यावर एक विशिष्ट थर आल्याचेही दिसते. प्रदूषण रोखण्यात महामंडळ पूर्ण अपयशी ठरले असून प्रदूषणाला जबाबदार असलेल्या घटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली होती.गंगेला अक्षरशः डबक्याच स्वरूप आले असून सदरचे पाणी जनावरे सुद्धा पीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही धार्मिक प्रवृत्तीचे लोक गंगा गोदावरीला पवित्र समजून त्याच पाण्यात स्नान करीत आहेत. त्यामुळे अनेकांना त्वचारोग सारखे असाध्य रोग जडत आहेत,सध्या विविध गावात यात्रांची पर्वणी सुरू आहे दूरवरून अनेक भाविक भक्त तरुण मंडळी देवाला पाणी नेण्यासाठी येतात मात्र गटर गंगेचे पाणी देवासाठी नेले जात आहे ही वस्तुस्थिती आहे. प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नेमकी काय पाहणी केली त्यांनी मळ्यात माशांचे नमुने नेले आहेत का नाही नेले असतील तर त्याचा अहवाल कधी येणार याकडे लक्ष लागून आहे.
Post Views:
149