कोपरगावात पालिकेच्या व्यापारी संकुलासाठी आमदार काळे कडून चाचपणी
Inspection by MLA Kale for the commercial complex of the municipality in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 25 April23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरात कमर्शिअल कॉम्प्लेक्स (व्यापारी संकुल) उभारण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवारी (दि 25) रोजी नगरपालिका अधिकारी यांची भेट घेऊन चाचपणी केली आहे.
कोपरगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा मागील अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लावला आहे. कोपरगाव शहरातील सर्वच रस्त्यांना व शहर सुशोभिकरणाला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे रस्ते चकाचक होऊन कोपरगावमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोपरगाव शहराची बाजारपेठ पुन्हा फुलवायची असेल तर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना सर्व प्रकारची खरेदी कोपरगाव शहरातच करता यावी व मोठ्या शहरामध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना व्यापारी संकुलात कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल त्यासाठी व्यापारी संकुल उभारण्यासाठी कोणत्या जागा कोपरगाव नगरपरिषदेकडे उपलब्ध आहेत. नवीन कोणत्या जागेवर अद्यायावत व्यापारी संकुल उभारणे कोपरगाव शहराच्या बाजार पेठेला आर्थिक चालना देवू शकेल याबाबत आ. आशुतोष काळे यांनी सविस्तर माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी या बैठकीसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, सहाय्यक नगररचनाकार दिपकजी बडगुजर, आर्किटेक्ट राजेंद्र मुंजे आदी उपस्थित होते.