कोपरगाव पोलीस कर्मचारी यांना चालूमोटरसायकलवरच  हृदय़ विकाराचा झटका

कोपरगाव पोलीस कर्मचारी यांना चालूमोटरसायकलवरच  हृदय़ विकाराचा झटका

Kopargaon policeman suffered a heart attack while riding his motorcycle 

मोटर सायकलवर पडली,  सहप्रवासी मामा  सुखरूप Motor cycle fell, co-passenger mama unharmed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 27 April23 ,16.30 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : चालू मोटर सायकल वर पोलीस नाईक यांना  हृदय विकाराचा झटका आल्याने  मोटरसायकल खाली पडली ही घटना शहरातील नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थ केंद्रासमोर, रोडवर,कोपरगाव येथे घडली. या पोलीसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना मृत्यू आला. सुदैवाने जोडीदार  मामा  (बालपणीचा मित्र)    या अपघातातून बचावला. मयत पोलीस नाईक यांचे  नाव राजु तुकाराम चव्हाण (वय 44),असून कोपरगाव तालुका  पोलीस स्टेशनला नोकरीस असून  मुळ.रा.घुमटवाडी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर येथील आहे.

ही घटना बुधवारी रात्री 08:15 वाजेचे सुमांरास पोलीस पेशंट पासून हजार  मीटर अंतरावर नवश्या गणपती मंदिर व स्वामी समर्थकेंद्रासमोर, रोडवर,  घडली. मयत पोलीस नाईक यांचे  नाव राजु तुकाराम चव्हाण व  मामा प्रेमदास तारू पवार,(वय 45 वर्षे),व्यवसाय एसटीवाहक, रा.वागळुज, ता.आष्टी,जि-बीड,हे दोघेजण सोबत मोटार सायकलवरून जेवण करण्यासाठी जात असतांना पोलीस नाईक चव्हाण यांनी मामाला गाडीवरून खाली उतरवले व दोन मिनिटात येतो असे सांगून  मोटार सायकल पुन्हा पाठिमागे वळवुन घेवुन जात असतांना हृदय विकाराचा झटका आला. त्यामुळे त्याचे  मोटरसायकल वरील नियंत्रण गेल्याने ती मोटरसायकल हळु करून एका बाजुस झुकुन खाली पडला. मामाने ताबडतोब औषधोपचारकामी डॉ.मुळे हॉस्पिटल येथे नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन ते औषधोपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितल्याने त्यांना ग्रामिण रूग्णालय, कोपरगाव येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मयत झाल्याचे घोषीत केले आहे. मयत पोलीस नाईक  राजू चव्हाण यांचे    मामा प्रेमदास तारू पवार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला  खबर दिल्यावरून  अ.मृ. रजिस्टरी दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.भरत एच.दाते, हे पुढील तपास करीत आहेत 
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस कर्मचारी यांनी शोक व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली केली

चौकट 

बुधवारी सायंकाळी   मयत पोलीस नाईक राजू चव्हाण हे देर्डे फाटा येथील एका बेवारस प्रेताचा अंत्यविधी करून आल्यानंतर ते आपल्या मामा (बालपणीचा मित्र) दिवसांनी आल्याने त्याला सोबत घेऊन ते बाहेर जेवणासाठी जात असताना  ही घटना घडली सहकारी पोलिसांमध्ये ते ‘मनाचा राजा माणूस’  म्हणून  प्रसिद्ध होते

Leave a Reply

You cannot copy content of this page