शिवार फेरीमध्ये मृदू व जलसंधारणाची कामे सुचवा – स्नेहलता कोल्हे

शिवार फेरीमध्ये मृदू व जलसंधारणाची कामे सुचवा – स्नेहलता कोल्हे

Suggest wetland and water conservation works in Shiwar ferry – Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 27 April23 ,16.20 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : जलयुक्त शिवार अभियान-२ अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील २३ गावांची निवड करण्यात आली आहे.  या निवड झालेल्या  गावातील लोकांनी शिवार फेरीमध्ये मृद व जलसंधारणाची कामे सुचवावीत, असे आवाहन  भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,  जलयुक्त शिवार‎ अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने ‘जलयुक्त शिवार अभियान-२’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत कोपरगाव तालुक्यातील बोलकी, ब्राह्मणगाव, धारणगाव, चांदगव्हाण, जेऊर पाटोदा, करंजी (बु.), खिर्डी गणेश, कोकमठाण, मळेगाव थडी, मुर्शतपूर, सडे, रवंदे, शिंगणापूर, येसगाव, टाकळी, संवत्सर, सोनारी, नाटेगाव, सांगवी भुसार, माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, सुरेगाव, चासनळी या २३ गावांची निवड झाली आहे. 
जलयुक्त शिवार अभियान-२ च्या संनियंत्रणासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या‎ अध्यक्षतेखाली तर तालुका पातळीवर प्रांताधिकाऱ्यांच्या‎ अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. कोपरगाव तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी माणिकराव आहेर असून, समितीच्या सचिव उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्रीमती खेमनर आहेत, तर तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता लाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शिंदे हे सदस्य आहेत. जलयुक्त शिवार‎ अभियानांतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’, नवीन साठवण बंधारे, जुन्या साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती तसेच पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यात येणार आहेत. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येणार आहे.  ग्रामस्थांनी शिवार फेरीमध्ये सहभागी होऊन आपल्या गावात नवीन साठवण बंधारे, जुन्या साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती व जलसंधारणाची कामे सुचवावीत. तसेच याबाबत काही अडचणी आल्यास कोपरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

चौकट……….

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मिळवून कोळ नदीचे पुनरुज्जीवन केल्यानंतर पूर्वी गाळाने भरलेली कोळ नदी सध्या वाहती झाल्यामुळे आपेगाव, शिरसगाव, तिळवणी, उक्कडगाव, कासली, कान्हेगाव, वारी, तळेगाव मळे, घोयेगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे.त्याचा या भागातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.   

Leave a Reply

You cannot copy content of this page