बाजार समितीत स्थानिक युतीच्या बाजूने जनादेश – बिपीन कोल्हे 

बाजार समितीत स्थानिक युतीच्या बाजूने जनादेश – बिपीन कोल्हे 

Mandate in favor of local alliance in market committee – Bipin Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 May23 ,18.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : अंतिम टप्प्यात बाजार समिती निवडणुक बिनविरोध होता होता राहिली.तरीही मतदार राजांने शेतकरी हित लक्षात घेवुन मतपेटीच्या माध्यमांतुन  मतदारांनी  आमच्या स्थानिक युतीच्या बाजूनं जनादेश दिला आहे, तो सर्वार्थाने योग्य असुन त्या बद्दल व मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीचे केंद्र असलेल्या बाजार समितीच्या माध्यमांतुन शेतकरी विकासाला सर्वांना बरोबर घेवुन सर्वोच्च प्राधान्य देवुन  विकास असाच सर्वसंमतीने पुढे नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू. असं ते म्हणाले.

बिपीन कोल्हे म्हणाले, शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेऊन ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणुन बाजार समिती हा महत्वाचा धागा आहे.शेतमाल खरेदी विक्री बाजार समितीत उत्तम रीतीने चालण्यासाठी
शेतकरी,व्यापारी, उद्योजक,नागरिक यांच्यासह  तालुक्यातील सर्वपक्षीय नेते सहकार्य करतील  असा विश्वास आहे. असे सांगून त्यांनी यावेळी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page