माहेगाव देशमुख  सोसायटी अध्यक्ष  काळे, उपाध्यक्ष  देशमुख

माहेगाव देशमुख  सोसायटी अध्यक्ष  काळे, उपाध्यक्ष  देशमुख

Mahegaon Deshmukh Society President Kale, Vice President Deshmukh

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 May23 ,18.20 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्षपदी यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अध्यासी अधिकारी नामदेवराव ठोंबळ सहाय्यक निबंधक,  यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली.

 अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी एक एक नावाची सूचना आल्याने निवडणूक अधिकारी नामदेवराव ठोंबळ यांनी अध्यक्षपदी मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्षपदी यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

यावेळी संचालक संजय काळे, डॉ शिवाजी रोकडे, अशोकराव विश्वनाथ काळे, भरत दाभाडे, वसंत काळे, शिवाजी लांडगे, भागीनाथ काळे, जगन्नाथ जाधव, सौ.संगीता सूर्यभान काळे, सौ.उर्मिला चंद्रकात कापसे उपस्थित होते. निवडणूककामी सेक्रेटरी संदिप बोरनर यांनी सहकार्य केले.

सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्ष यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांचे संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page