कोपरगाव रिक्षा संघटनेचे महामार्ग रास्ता रोको स्थगित
Kopargaon Rickshaw Association’s highway road stop suspended
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 May23 ,18.00 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव: कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने नगर मनमाड महामार्गावरील साई तपोभूमी चौकात दोन्ही बाजूला गतिरोधक टाकावे या मागणीसाठी साई तपोभूमी चौकात बुधवारी तीन मे रोजी सकाळी दहा वाजता महामार्ग रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प कार्यकारीअभियंता बडगुजर यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी दिली.
नगर मनमाड महामार्गावर प्रचंड वाहतूक असते या रस्त्याचे एका पश्चिम बाजूला शहर आहे तर पूर्व बाजूला रेल्वे स्टेशन इंजीनियरिंग कॉलेज साखर कारखाना महिला कॉलेज दूध संघ त्यामुळे सातत्याने या रस्त्यावर रहदारी असते व विद्यार्थी कामगार यांना प्रवासी यांना रस्ता ओलांडताना भरदार वाहनामुळे अपघात होण्याची शक्यता दाट आहे त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक टाकावे अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प कार्यकारी अभियंता यांच्याकडे २६ एप्रिल रोजी करण्यात आली होती अर्जाची दखल न घेतल्यास तीन मे रोजी साई तपोभूमी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता बडगुजर यांनी दोन-तीन दिवसात या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर रिक्षा संघटनेने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे, काम न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशाराही संघटनेचे वतीने देण्यात आला आहे. यावेळी रिक्षा चालक व पदाधिकारी उपस्थित होते
Post Views:
197