उपजिल्हाधिकारी कार्यालयाने कोपरगाव’जिल्ह्याची मुहूर्तमेंत रोवावी 

उपजिल्हाधिकारी कार्यालयाने कोपरगाव’जिल्ह्याची मुहूर्तमेंत रोवावी 

Deputy Collector’s office should arrange the timing of Kopargaon district

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 May23 ,18.10 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : गेल्या अनेक वर्षापासून  क्षेत्रफळाने मोठे असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे अशी मागणी सर्वत्र होत आहे  त्यात कोपरगाव जिल्हा  व्हावा अशी कोपरगावच्या जनतेची मागणी आहे याचा विचार करता उपजिल्हाधिकारी कार्यालयाने कोपरगाव’ जिल्ह्याची मुहूर्तमेंत रोवावी अशी मागणी जयहिंद विचार मंचच्या वतीने किशोर चोरगे यांनी एका पत्रकाद्वारे राज्य शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

समाज माध्यमात राज्यात नवीन जिल्हा, तालुका निर्मितीची चर्चा सुरू आहे. कोपरगाव जिल्ह्याचे नाव आघाडीवर आहे. जिल्हा विभाजनासाठी कोपरगाव हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून निश्‍चित करावे, अशी मागणी होत आहे. गेले कित्येक वर्षापासून राज्यात नवीन २२ जिल्हे, ४९ तालुके करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदारपणे सुरू आहे. नवीन  जिल्ह्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे.
नगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव १९८०-८१ पासून शासनाच्या विचाराधीन नवीन  जिल्ह्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगांव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या तालुक्यासाठी स्वतंत्र जिल्हा मुख्यालय कोपरगाव योग्य असून अंदाजे तशी शिफारस मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीनेही अहवालात केली आहे.
 कोपरगाव जिल्ह्यात कोणत्या तालुक्‍यांचा समावेश आहे हे समजू शकले नाही. परंतु अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगांव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरीसह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येवला छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर  या तालुक्‍यांची नावे चर्चेत आहेत. कोपरगाव जिल्हा निर्माण करणे हे भौगोलिक सलगतेच्या दृष्टीने योग्य ठरेल, असे काही तज्ञांचे मत आहे. नवीन जिल्हा करताना सर्वांच्या सोयीने आणि मध्यवर्ती ठिकाण असलेला तालुका जिल्हा म्हणून करावा, असाही सूर उमटत आहे. प्रस्तावित  जिल्ह्यात कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण आणि सर्वांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार असल्यामुळे  नव्या कोपरगाव जिल्ह्याचे ठिकाण करावे, असा तालुक्‍यातून सूर उमटत आहे. त्यात समावेश होणारे सर्वच तालुके ४० ते ७० किलोमीटर अंतरात येतात. 
कोपरगाव शहराच्या दुसऱ्या विकास आराखड्यात भविष्यातील कोपरगाव जिल्हा मुख्यालय डोळ्यासमोर ठेवून रचना व जागांचे आरक्षण करण्यात येण्या करता शासकिय जागा हि मुबलक आहे व निवास स्थानासाठी ७.७७ हेक्टर जमीन आरक्षित करता येऊ शकते  भविष्यात कोपरगाव जिल्हा मुख्यालय झाल्यास सरकारी कार्यालये व कर्मचारी निवासस्थानासाठी इमारती बांधण्यास ऐनवेळी जागेची शोधाशोध करावी लागणार नाही. कोपरगाव जिल्ह्याला तीन विभागीय जिल्ह्यांच्या सीमा आहे या कोपरगाव जिल्हा कृती समितीच्या मागणीवर कोपरगाव जिल्हा होण्या बाबतचे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांचे सकारात्मक सुतोवासाचे दखल पत्र हि कोपरगाव जिल्हा कृती समितीला आले आहे 
कोपरगावला विमानतळ,  सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा असलेले अद्यावत रेल्वे स्टेशन,  सर्व प्रकारचा  शेती माल उतरवणारा रेल्वे मालधक्का,  बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोपरगाव मुंबई महामार्ग सुरत हैदराबाद, काश्मीर ते कन्याकुमारी असे तीन महामार्ग  कोपरगावातून जातात   जगातील सर्वात मोठे शिर्डी साईबाबा समाधी मंदिर   स्थळ कोपरगाव पासुन १५ कि.मी अंतरावर आहे दोन साखर कारखाने,दुध संघ,  इंजीनियरिंग, मेडिकल कॉलेज, शैक्षणिक हब, अद्यावत अशी प्रशासकीय कार्यालये, इमारती, सबजेल, औदयोगिक वसाहत, न्यायालय, बँकिंग क्षेत्र आहेत  कोपरगाव तालुका हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण झाल्यास  मोठी आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोपरगाव जिल्हा करावा असा सूर उमटू लागला.त्याची सुरुवात उपजिल्हाधिकारी कार्यालयाने करावी अशी मागणी जयहिंद विचार मंचावतीने करण्यात आली आहे त्यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती, मार्केट कमिटी, इतर सर्व प्रकारच्या संस्था, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या मागणीला समर्थन देत आवाज उठवावा. असेही किशोर चोरगे यांनी म्हटले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page