कोपरगांव पिपल्स बँकेला ४ कोटीचा ढोबळ नफा, – कैलासचंद ठोळे
4 crore gross profit to Kopargaon People’s Bank, – Kailaschand Thole
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 3 May23 ,18.30 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव – कोपरगांव अहमदनगर, औरंगाबाद व नाशिक जिल्ह्यात शाखा विस्तार असलेली कोपरगाव पिपल्स को-ऑप. बँकेला ३कोटी ९७ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. अमृत महोत्सवानिमित्त सभासदांना १५ टक्के लाभांश व भेट पावती देण्याचा मानस बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला
बँकेने सन २०२२ २०२३ मध्ये वर्ष अखेरीस बँकेच्या आर्थिक परिस्थितीत भरघोस प्रगती करीत ठेवी रूपये २७५ कोटी ५९ लाख, कर्ज वाटप १६१ कोटी ०८ लाख, भागभांडवल ६ कोटी ५७ लाख, गुंतवणूक १४४ कोटी ०४ लाख, ग्रॉस एन.पी.ए. ६.३२%, नेट एन.पी.ए. ०.६०%, इतका असून बँकेचा ढोबळ नफा ३ कोटी ९७ लाख झाला आहे व सर्व तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रू.२ कोटी ३७ लाख आहे.
बँकेने उत्तुंग भरारी कायम ठेवीत याही वर्षी मार्च २०२३ अखेर आर्थिक क्षेत्रात भरघोस प्रगती केली आहे.
यावेळी चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी सांगीतले की, बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालु असून अमृत महोत्सवी वर्षात बँकेने मोबाईल बँकींग सुविधा उपलब्ध करून दिली असून अन्य सुविधा देखिल नजिकच्या काळात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे यांनी सांगितले की, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे सहकार्याने बैंकने ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सहकार खात्यांची परवानगी घेऊन सभासदांना भेट पावती देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
या सर्व पार्श्वभुमीवर सेवक वर्गाने केलेल्या चांगल्या कामाची दखल व्यवस्थापनाने घेऊन सर्व कर्मचारी वर्गाला २०२२ – २०२३ चा बोनस व सानुग्रह अनुदान म्हणुन दोन महिन्याचा पगार दिला आहे.
बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे यांनी सांगितले की, संपूर्ण बँकींग क्षेत्र हे सध्या एका वेगळ्या संक्रमणातुन जात आहे. यामध्ये देखिल बँकेच्या कर्जदारांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवुन वेळीच आपले खाते व्यवहार नियमित करून बँकेला सहकार्य केले आहे व वेळीच आपले खाते नियमित केल्याने बँकेची मोठ्या प्रमाणावर वसुली होऊन, याही वर्षी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या निकषांची पुर्तता केली आहे ही बँकेच्या सुरक्षिततेच्या व विश्वासाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
आतापर्यंत बँकेचे ठेवीदार, कर्जदार, खातेदार, सभासद व हितचिंतक यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. बँकेस सतत “अ” वर्ग प्राप्त असून बँक दरवर्षी १५% लाभांश देत असून याही वर्षी १५% लाभांश सभासदांना देण्याचा मानस आहे. यापुढेही संचालक मंडळ यशाची चढती कमान अशाच प्रकारे कायम ठेवील असा विश्वास बँकेचे चेअरमन कैलासचंद ठोळे व संचालक मंडळ यांनी व्यक्त केला.
बँकेच्या या प्रगती मध्ये बँकेचे संचालक रविंद्र लोहाडे, सुनिल कंगले, अतुल काले, कल्पेश शहा, धरमकुमार बागरेचा, राजेंद्र शिंगी, सुनिल बंब, सत्येन मुंदडा, रविंद्र ठोळे, सुनिल बोरा, दिपक पांडे, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, प्रतिभा शिलेदार, त्रिशला गंगवाल तज्ञ संचालक अॅड. संजय भोकरे, प्रसन्ना काला, संदीप रोहमारे, निरज काले, अॅड. एस. डी. कुलकर्णी, अॅड. पी. बी. पटणी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे, असि. जन. मॅनेजर जितेंद्र छाजेड, वसुली अधिकारी विठ्ठल रोठे व बँकेचा सर्व सेवक वर्ग यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.
Post Views:
150