समता पतसंस्थेची सेवा क्यु.आर कोडमुळे बँकांच्या तोडीची – काका कोयटे

समता पतसंस्थेची सेवा क्यु.आर कोडमुळे बँकांच्या तोडीची – काका कोयटे

Samata Credit Institution’s Service Breaks Banks Due to QR Code – Kaka Koyte

बँकिंग सेवा देण्यात समता पतसंस्था महाराष्ट्रात प्रथमSamata Credit Institution is the first in Maharashtra to provide banking services

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 11 May23 ,17.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली द्वारे सुरू आहे. मोबाईल, व्हावचरलेस, पेपरलेस , फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, कॉल सेंटर या प्रणालीमुळे बँकिंग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या समता पतसंस्थेने क्यु.आर कोड द्वारा कुठलेही शुल्क न करता इनकमिंग व आउट गोइंग व्यवहार सुरू करून बँकांच्या तोडीची बँकिंग सेवा देण्यात समताचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असल्याचे गौरवउद्गार व संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी ३८ व्या वर्धापनदिनी वार्षिक सर्व साधारण सभेत व्यक्त केले.यामुळे समता पतसंस्थेचे कामकाज राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांपेक्षाही   सरस होणार असून ग्राहकांना अधिक सुविधा मिळतील असेही ते म्हणाले.

    सेल्फ बँकिंग प्रणाली व  क्यु.आर. कोड आउट गोइंग सेवेचा शुभारंभ  विजय नायडू, डॉ.नरेंद्र भट्टड, शाम जंगम यांच्या हस्ते करण्यात आला.
 काका कोयटे पुढे म्हणाले की, यु.पी.आय प्रणालीच्या माध्यमातून क्यु.आर कोड द्वारा राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालत आहे.  भारतात  यु.पी.आय प्रणाली मार्फत कोट्यावधीची ट्रांजेक्शन दररोज होत असतात  या प्रणालीशी  इनकमिंग व आउट गोइंग पद्धतीने जोडली जाणारी  भारतासह महाराष्ट्रातील समता पतसंस्था ओळखली जाणार आहे. 
 याबाबत  संदीप कोयटे म्हणाले की, भारतातील बँकिंग व्यवहारात  अद्याप ६० टक्के लोक या प्रणालीशी जोडले गेलेले नाहीत.  या प्रणालीची ट्रांझक्शन यु.पी.आय द्वारे प्रचंड वेगाने होत आहे. या योजनेमुळे समताच्या ग्राहकांना भारतात कुठेही पेमेंट करता येणार आहे ग्राहकांच्या खात्यावर जमा असलेल्या रकमेवर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकात केवळ दोन ते तीन टक्के व्याज देतात परंतु समता सात टक्के  व्याजासह खास बक्षीसही देणार तर आता समता पतसंस्था ‘हर घर क्यु.आर.कोड’ योजना  राबवणार असल्याचे ते म्हणाले, 
नेटविन सॉफ्टवेअरचे संचालक उत्तम घाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मेनन, मार्केटिंग अधिकारी मसूद अत्तार, आणि आय.सी.आय.सी.आय. बँकेचे रिजनल हेड शरद ढगे, जो जोसेफ आदी पदाधिकारी उपस्थित होते. , 
बोटावर मोजता येतील अशा सहकारी बँका सोडल्या तर यु.पी.आय.प्रणाली मार्फत क्यु.आर.कोड तंत्रज्ञान वापरात आणणारी समता ही देशातील पहिली पतसंस्था असल्याचे गौरव उद्गार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले  
 जनरल मॅनेजर सचिन भट्टड म्हणाले की, समताचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, आय.टी.विभाग आणि नेटविन सॉफ्टवेअर प्रा.लि. यांनी वर्षभर या योजनेवर संशोधन करून ही परिपूर्ण योजना प्रत्यक्षात आणली आहे. यामुळे पतसंस्था चळवळ ही सुदृढ आणि सक्षम होणार आहे.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संचालक अरविंद पटेल यांनी तर सुत्रसंचालन संजय पारखे यांनी केले. 
यावेळी चेअरमन काका कोयटे,  संचालक गुलाबचंद अग्रवाल, अरविंद पटेल, जितूभाई शहा, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी,  कचरू मोकळ,संदीप कोयटे, संचालिका सौ. शोभा अशोक दरक, तसेच संस्थेचे ग्राहक, सभासद, मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page