दुर्मिळ डोंगरची काळी मैना कोपरगाव च्या बाजारात दाखल  

दुर्मिळ डोंगरची काळी मैना कोपरगाव च्या बाजारात दाखल  

Rare mountain black myna entered the market of Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 10 May23 ,19.30 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  करवंद हा रानमेवा ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून ओळखली जाते. ही मैना कोपरगावच्या बाजारात दिमाखदारपणे दाखल झाली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी हा रानमेवा उशिरा दाखल झाला आहे. पावसाआधीच बाजारात दाखल झालेले करवंद घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच झुंबड उडत आहे. पर्यावरणाची हानी व वनवा लागून डोंगर पेटून अनेक झाडे जाळून जात आहेत व सरपणासाठी वृक्षतोड झाल्यामुळे करवंदांच्या झाडांची संख्या कमी होत चालली आहे. तरी यंदा करवंद कमी प्रमाणात असून, या फळाचे भावही वधारले आहेत.

चैत्र महिन्यापासून या करवंदाच्या आंबट गोड जाळ्या पसरायला सुरुवात होते. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यानंतर हिरव्या रंगाची करवंदे झाडाला लागतात. पण या वर्षी हवामानाच्या परिणामामुळे करवंदे उशिरा आली आहेत. डोंगराची काळी मैना म्हणून नावलौकिक असलेले करवंद बाजारात दाखल झाली आहेत. एका किलोसाठी शंभर रुपयांचा दर मिळत आहे.
 काळी मैना खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे, हा गावरान मेवा डोंगरची मैना दुर्मिळ होऊ लागली आहे. बाहेर काळ्या रंगाच्या आणि आतून लाल, हिरवा गर असलेल्या या छोट्याशा नाजूक फळाचे जंगलातील नैसर्गिक उत्पादन घटले आहे. करवंदांप्रमाणेच याचा परिणाम इतरही आरोग्य संपन्न रानमेव्यावर झाला आहे. रानात मिळणारी इतरही वेगवेगळ्या प्रकारची फळे दुर्मिळ झाली आहेत.
करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे तेव्हा ती त्वचाविकारामध्ये करवंद सेवन फायदेशीर ठरते. करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असते त्यामुळे या दिवसांत उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर करवंद फायदेशीर आहेत. या दिवसात उष्णतेमुळे शरीराची काहिली होते तेव्हा करवंदाचे सरबत प्यायल्याने अधिक आराम मिळतो. करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील करवंद उत्तम आहेत. त्यामुळे जांभूळ करवंद विविध प्रकारचे रानमेवा फळे प्रत्येकाने खावीत.
एखादा तुरट, एखादा आंबट तर एखादा अगदीच गोड अशा रिमिक्स चवीने भुरळ घालणारे करवंद म्हटले की सगळ्यांनाच खाण्याची इच्छा होते.
करवंदाच्या हिरव्यागार पानाच्या द्रोणात छोटे माप पाच रुपये, मोठे माप दहा रुपये अशा पद्धतीने करवंदाची विक्री केली जात आहे. पूर्वी वाटा पद्धत असायची व त्यानुसार वाटा तयार करून रुपया, दोन रुपयांत करवंदे विक्री होत असत. ग्राहक करवंदांची एक पूर्ण पाटी घेऊन चार-पाच ‘वाटून घेत असत.
हा गावरान मेवा सायकल वरती घेऊन फिरणारे आपत्ती व्यवस्थापनात जीव रक्षक म्हणून काम करणारे विलास आरण दारोदार आरोळी ठोकून भटकंती करत आहेत, विविध सिजनेबल धंदे ते करतात.      

Leave a Reply

You cannot copy content of this page