संवत्सर येथे शॉर्टसर्किटमुळे परजणे यांची अडीच एकर डाळिंबाची बाग जळाली

संवत्सर येथे शॉर्टसर्किटमुळे परजणे यांची अडीच एकर डाळिंबाची बाग जळाली

Parjane’s two-and-a-half acre pomegranate garden got burnt due to a short circuit at Samvatsar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 May23 ,19.00 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :तालुक्यातील संवत्सर रामवाडी शिवारात ट्रान्स्फॉर्मरमधील झालेल्या शॉर्टसर्किटमुळे येथील कृष्णराव नामदेवराव परजणे यांची अडीच एकर डाळिंब बाग  व त्यातील ठिबक सिंचनासह  अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

संवत्सर येथील शेतकरी व कोपरगांव पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांची रामवाडी शिवारात बागायती शेती असून त्यांच्या सर्व्हे नं. १०१ मधील भगवा जातीच्या डाळींबाच्या बागेला मंगळवार दि. १६ मे २०२३ रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्कीटने आग लागली. या आगीत   डाळींबाच्या झाडांना आग लागली. जवळजवळ अडीच एकर  बाग आगीत  सापडल्याने डाळिंब बाग ऐन भरात व उत्पादन देण्याच्या स्थितीत होती.  ट्रान्स्फॉर्मरमधून नुकत्याच झालेल्या शॉर्टसर्किटमुळे डाळिंब बाग व त्यातील ठिबक सिंचनाचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.  या दुर्घटनेत सुमारे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यामुळे परजणे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले याबाबत त्यांनी महावितरणला कळवले. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परजणे यांनी  केली आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या  अग्नीशामक दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशामक बंब तातडीने पोहोचल्यानें आग आटोक्यात आणण्यास मदत झाली. आगीच्या या घटनेने संवत्सर परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page