कोपरगाव बाजार समिती सभापती साहेबराव रोहोम , तर उपसभापती गोवर्धन परजणे
Kopargaon Bazar Committee Chairman Sahebrao Rohome, Vice Chairman Govardhan Parjane
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 May23 ,19.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरूवारी झालेल्या निवडीत सभापती म्हणून कोल्हे गटाचे साहेबराव रोहोम तर उपसभापती म्हणून काळे गटाचे गोवर्धन परजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कोपरगाव बाजार समिती गेल्या पंधरा वर्षापासून काळे कोल्हे परजणे औताडे यांच्या ताब्यात आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काळे कोल्हे परजणे औताडे पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने १८ पैकी १५ जागा जिंकून बहुमत मिळवले होते.
गुरूवारी (१८मे) रोजी बाजार समिती सभागृहात सहायक निबंधक नामदेव ठोंबळ यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी सर्व सदस्यांची बैठक झाली. त्यावेळी
कोल्हे गटाकडून साहेबराव रोहोम तर उपसभापती म्हणून काळे गटाकडून गोवर्धन परजणे यांनी पदासाठी अर्ज दाखल केले होते.त्यामुळे सभापती म्हणून साहेबराव रोहोम तर उपसभापती म्हणून काळे गटाचे गोवर्धन परजणे यांची बिनविरोध निवड झाली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहाय्यक निबंधक नामदेवराव ठोंबळ होते. अध्यक्षस्थानी कृषीरत्न दत्तात्रय कोल्हे होते.
याप्रसंगी संचालक बाळासाहेब गंगाधर गोर्डे, शिवाजीराव बापूराव देवकर, लक्ष्मण विश्वनाथ शिंदे, संजय माधवराव शिंदे, मिराताई सर्जेराव कदम, माधुरी विजय डांगे, खंडेराव पुंजाबा फेफाळे, राजेंद्र शंकरराव निकोले, रावसाहेब रंगनाथ मोकळ, अशोकराव सोपान नवले, रामदास भिकाजी केकाण, रेवणनाथ श्रीरंग निकम, ऋषीकेश मोहन सांगळे, रामचंद्र नामदेव साळुंके उपस्थित होते
निवडीनंतर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व आमदार आशुतोष काळे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी बिपिन कोल्हे म्हणाले स्वर्गीय शंकरराव काळे व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या शिकवणीप्रमाणे बाजार समिती ही शेतकऱ्यांची कामधेनू आहे इथे राजकारण नको म्हणून निर्णय घेतला या निर्णयास आमदार आशुतोष काळे महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे पोहेगाव पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन औताडे शेतकरी व सभासदांनी सहकार्य केले आता नवनिर्वाचित संचालक मंडळाला शेतकरी, व्यापारी, हमाल मापाडी यांच्यासह सर्व घटकांना बरोबर घेऊन बाजार समितीची उन्नती करून नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.
सभापती साहेबराव रोहोम म्हणाले की, बाजार समितीचा सभापती होण्याची संधी विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हे यांनी दिली. सभासदांनी जो विश्वास टाकला त्या संधीचे सोने करू.
याप्रसंगी अरूणराव येवले, त्रंबकराव सरोदे, विश्वासराव महाले, शिवाजीराव वक्ते, बापूसाहेब सुराळकर, कृष्णा परजणे, कोसाकाचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, मच्छिंद्र टेके, नानासाहेब गव्हाणे, प्रदिप नवले,संदिप देवकर, सुनिल देवकर, राजेंद्र देवकर, हेमंत निकम, सतिष बोरावके, प्रशांत वाबळे, अनिल चरमळ, बाबासाहेब महाले, विश्वास बोळीज, दिपक चौधरी, विक्रम पाचोरे, धरमशेठ बागरेचा, देवेंद्र रोहमारे, यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी व बाजार समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. शेवटी सचिव नानासाहेब रणशुर यांनी उपस्थितांचे आभार मानले.