पोटात विळ्याने मारून जावयाने सासुला केले जखमी
The father-in-law injured his mother-in-law by stabbing him in the stomach
नवरा-बायकोच्या वादातील हस्तक्षेप सासुला महागात पडलाInterference in the husband-wife dispute cost the mother-in-law dearly
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 June24 ,13.30. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पत्नी नांदायला येत नाही या कारणाची कुरापत काढुन जावयाने भांडण सोडवणाऱ्या सासुच्या पोटात पाठीवर दंडावर विळ्याचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कोपरगाव शहरातील रोहीदास नगर येथे शनिवारी (४मे) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.
नवरा-बायकोचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सासुवर धारदार विळ्याने जिवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.या घटनेत सासु नंदा विजय हंडोरे वय (५५) रा. रोहीदासनगर ही गंभीर जखमी झाली आहे उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव, श्री साईबाबा हॉस्पीटल शिर्डी दाखल केले आहे. या घटनेची माहिती समजताच शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. रामराव ढिकले, पो.स.ई. रोहीदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अमोल विजय हांडोरे, (३३), धंदा – मजुरी, रा. रोहीदासनगर, कोपरगाव ता. कोपरगाव याने फिर्याद दिली असुन या फिर्यादीत म्हटले आहे की,
आपल्या बहीणीचे निलेश विजय सोमवंशी, रा. पाथर्डी, नाशिक जि.नाशिक याचेशी लग्न झालेले होते. आपली बहीण सासरी नांदावयास जात नव्हती ती माहेरी माझेकडे राहते. तिचे नांदण्याचे कारणावरुन यातील आरोपी हे संगनमत करुन फिर्यादीचे घरी येवुन त्याचे बहीणीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करु लागले असता यातील माझी आई नंदा विजय हंडोरे वय (५५) रा. रोहीदासनगर ही त्यांना सोडविण्यास गेली असता आरोपी शिला विजय सोमवंशी व शितल विजय सोमवंशी दोन्ही रा. लासलगाव ता. लासलगाव जि. नाशिक यांनी तिला खाली पाडुन यातील आरोपी निलेश विजय सोमवंशी याने त्याचे हातातील लोखंडी विळ्याने तिचे पाठीवर, डावे हाताचे दंडाला, व पोटात मारुन तिला गंभीर जखमी केले आहे. तसेच फिर्यादीचे बहीनीस तु कोर्टातील केस काढुन घे नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निलेश विजय सोमवंशी विरोधात भादवि कलम ३२६,३२३,५०४, ५०६, ३४ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान आरोपी निलेश सोमवंशी हा पळून जात असताना पडल्याने जखमी झाला आहे त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Post Views:
259