कोपरगाव : कोपरगाव रेल्वे स्थानकात मुलभुत सुविधांची वानवा,- पराग संधान 

कोपरगाव रेल्वे स्थानकात मुलभुत सुविधांची वानवा,- पराग संधान 

Provision of basic facilities at Kopargaon railway station,- Parag Sandhan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 5 June24 ,16.30. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :सध्या कोपरगांव रेल्वेस्टेशन विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. कोपरगाव रेल्वेस्थानक साईभक्त व प्रवाशानी नेहमीच गजबजलेले असते. मात्र, रेल्वेस्थानकात  अजूनही अनेक मुलभुत सुविधांची वानवा असल्याचे स्थानिक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व अमृत शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग संधान यांनी सोलापुर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना पाठविलेल्या  निवेदनात म्हटले आहे.

प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन व तीनवर छप्पर नाही,प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी  सरकत्या जिन्याची सुविधा नाही, सुशोभीकरणासह पिण्याचे पाणी स्वच्छतागृह, शौचालय, बगीचा, रिक्षा व खाजगी वाहने पार्किंग,लॉंग गुड शेड लगत रस्त्याचे सायडींगचे कॉक्रीटीकरण,  लेबरसाठी पिण्याचे पाणी,  परिसरातील रहिवासी नागरिक व प्रवाशांना इकडुन तिकडे ये जा करण्यासाठी भूयारी मार्ग,  वंदे भारत रेल्वेला कोपरगांव येथे थांबा ही सर्व कामे तात्काळ पूर्ण करावी अशा मागण्या  स्थानिक सल्लागार समितीचे  पराग  संधान व रंगनाथ लोंढे यांनी निवेदनातून केल्या आहेत.  
   त्यांनी आपल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी कोपरगांव रेल्वे स्टेशन  सुविधांच्या परिपुर्ततेसाठी वेळोवेळी केंद्रीय रेल्वेमंत्री तसेच नामदार नितीन गडकरी यांच्या मार्फत मोठया प्रमाणांत पाठपुरावा केलेला आहे. 
            कोपरगांव तालुका  अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या तीन जिल्हयाच्या सीमेवर असुन  आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्रीसाईबाबा शिर्डी देवस्थान, श्रीक्षेत्र पुणतांबा येथील चांगदेवमहाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, जंगलीदास माउली, श्रीक्षेत्र गुरु शुक्राचार्य, मंजूर देवस्थान शिवानंदगिरी महाराज, कोकमठाण येथील ऐतिहासिक प्राचिन हेमाडपंथी मंदिर संवत्सर येथील शृंगेश्वर महाराज, चक्रधरस्वामी देवस्थान आदि ऐतिहासिक व धार्मीक परिसराला दर्शन व भेटी देण्यासाठी हजारो भाविक येथे रेल्वेने येत असतात.तेंव्हा  मागण्या तात्काळ पुर्ण करून नागरिकांसह रेल्वे प्रशासनाने सर्वांना दिलासा द्यावा असेही शेवटी निवेदनांत म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page