पर्यावरण संवर्धनासाठी दूरगामी उपाययोजना गरजेच्या -आ. आशुतोष काळे
Far-reaching measures are needed for environmental protection. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 6 June24 ,16.40. Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : भौतिक विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा होणारा र्हास मानवी जीवनाला हानिकारक असून जागतिक तापमानात झालेली वाढ हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे केवळ पर्यावरण दिन साजरा करून उपयोग नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठी दूरगामी उपाययोजना करणे गरजेच्या असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी जागतिक पर्यावरण दिनी सोमवारी (५मे) रोजी नगर परिषदेच्या वृक्षारोपण कार्यक्रमात म्हटले आहे.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की,
पर्यावरणाचा समतोल अजून बिघडला तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी आत्ताच सावध होणे गरजेचे असून दैनंदिन व्यवहारात पर्यावरणाचे संवर्धन होईल याची काळजी घेणे महत्वाचे आहे. वृक्ष लागवड गरजेची आहे परंतु त्याचबरोबर वृक्षाचे संगोपन देखील अत्यंत महत्वाचे आहे. वृक्षांची लागवड करण्यात येते परंतु त्यांचे योग्य संगोपन न झाल्याने हे वृक्ष केवळ कागदोपत्रीच दिसतात.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार, बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, सोमैय्या महाविद्यालयाचे चेअरमन संदिप रोहमारे, विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. माधवी वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, राजेंद्रवाकचौरे, अजीज शेख, जावेदई शेख, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, धनंजय कहार, संदीप कपिले, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, डॉ. आतिष काळे, योगेश नरोडे, महेश उदावंत, विजय दाभाडे, पुंडलिक वायखिंडे, बाळासाहेब बारसे, परेश उदावंत, सागर विदुर, सचिन गवारे, शैलेश साबळे, योगेश वाणी, गणेश बोरुडे, जुनेद शेख, अय्युब कच्छी, राजेंद्र फुलफगर, प्रा. यादव, विशाल गुंजाळ, अमोल गिरमे, प्रदीप कुऱ्हाडे, किरण बागुल, गौतम खंडीझोड, रोहित वाघ, राकेश काले, मंदार आढाव, संजय कट्टे, अकील चोपदार, चंद्रशेखर देशमुख, महेश सावंत, शंकर निकम, सिमा पानगव्हाणे, भावना गवांदे, जयश्री जाधव, अंबादास आढाव, बाळासाहेब गायकवाड, विलास पाटोळे, संतोष आहेर, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, संगणक अभियंता भालचंद्र उंबरजे, आरोग्य अधिकारी सुनील आरणे, समनव्यक प्रविण मोटे आदी उपस्थित होते.
Post Views:
110