शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पाहण्यास मोठी गर्दी , संजीवनी युवा प्रतिष्ठानचा पुढाकार

शिवकालीन शस्त्र प्रदर्शन पाहण्यास मोठी गर्दी , संजीवनी युवा प्रतिष्ठानचा पुढाकार

Huge crowd to see Shiva period weapon exhibition, initiative of Sanjeevani Yuva Pratishthan

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 7 June24 ,18.00. Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा कोपरगावात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत असून जिल्हा बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक महिलांनी युवकांनी मोठी गर्दी केली होती. यात शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी भरविण्यात आले होते या प्रदर्शनाचे उदघाटन भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले ,हे शिवकालीन शस्र पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सौ कोल्हे यांनी प्रदर्शनातील सर्व शिवकालीन शस्त्र याची बार्शी येथील माधवराव देशमुख यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतींच्या उदात्त व लोककल्याणकारी कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे, या उद्देशाने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन विविध उपक्रमांनी संजिवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० राज्याभिषेक सोहळ्या निमित सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पवित्र नद्यांच्या पाण्याने विधिवत अभिषेक, ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशालींसह महाआरती करण्यात आली यावेळी नागरिक, शिवप्रेमी, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते
भाजपा आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page