सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा, संदिप वर्पे यांनीकेले आवाहन,
Witness the golden moment, Sandeep Varpe’s appeal,
उद्या ५ नं साठवण तलाव काँक्रिटीकरणाचा होणार शुभारंभ, आमदार आशुतोष काळे यांच्या स्वप्नपूर्तीचा सुवर्णक्षणThe concreting of storage pond No. 5 will start tomorrow, the golden moment of MLA Ashutosh Kale’s dream come true.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 9 June24 ,12.30. Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गेल्या अनेक वर्षापासूनचे कोपरगाव शहरवासियांचे दररोज पिण्याचे पाणी मिळावे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाच नंबर साठवण तलावाचे काँक्रिटीकरण एक पाऊल आहे. या कामाची सुरुवात आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते रविवारी (११मे ) रोजी दुपारी ४ वाजता येसगाव येथील पालिकेच्या साठवण तलाव या ठिकाणी संपन्न होणार आहे.आमदार आशुतोष काळे यांच्या स्वप्नपूर्तीच्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे यांनी पत्रकार परिषदेमधून केले आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधूनच शुक्रवारी(९मे) रोजी ११वाजता गौतम बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी संदिप वर्पे पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या प्राणी प्रश्नावर ज्याला जसे आकलन झाले तसे त्यांनी केले परंतु खऱ्या अर्थाने शहराच्या पाणी प्रश्नावर तोडगा मात्र आमदार आशुतोष काळे यांनीच काढला त्यामुळे विनंती आहे आव्हान करतो ज्वलंत जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नासाठी या बघा, समस्या मांडा या क्षणाचे साक्षीदार व्हा, असेही ते म्हणाले
शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले, कोपरगावकरांच्या पिण्याच्या पाण्याची सातत्याने हेळसांड झालेली आहे यामुळे वर्षानुवर्ष नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक निवडणुकीत हा प्रश्न गाजत राहिला. कित्येक वर्ष कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करून राजकीय पोळी भाजली गेली.कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पद नसतानाही रस्त्यावर उतरून संघर्ष केला
पाणी प्रश्नावर आंदोलन करताना आमदार आशुतोष काळे यांनी मला संधी द्या, तुमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवतो असा शब्द दिला जनतेने विश्वास ठेवून त्यांना मताधिक्याने निवडून दिले त्या दिवसापासून त्यांनी कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा केला. कोर्टकचेरी, राजकीय खोडा या सर्व अडीअडचणीतून मार्ग काढून मात केली त्यांना यश आले. पिण्याचा पाणी प्रश्नी,जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आ आशुतोष काळे यांनी पुढाकार घेऊन, स्वप्नाला आकार दिला. स्वप्नपुर्तीकडे टाकलेले हे एक पाऊल आहे, राजकारण सोडा, काम पाहण्यासाठी या, आपण सर्व सुवर्णक्षणाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन केले.
शुभारंभ प्रसंगी शहरवासीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरेन बोरावके यांनी प्रास्ताविकात केले. स्वागत कृष्णा आढाव यांनी केले तर आभार मंदार पहाडे यांनी मानले