निवडलेल्या मार्गावर आत्मविश्वासाने वाटचाल करून स्वप्न पूर्ण करा – आ. आशुतोष काळे
Fulfill the dream by walking confidently on the chosen path – come. Ashutosh Kale
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा Merit ceremony for meritorious students
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun11June24,16.40Pm By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता तुमची ताकद असलेल्या बुद्धीच्या जोरावर यशाचे उंच शिखर गाठताना आई-वडिलांचा व ज्येष्ठांचा विसर पडू देऊ नका करू नका. निवडलेल्या मार्गावर आत्मविश्वासाने वाटचाल करून स्वप्न पूर्ण करा अशा शुभेच्छा आ.आशुतोष काळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या.
शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन येथे रविवारी (१२जुन) रोजी सकाळी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने १० वी व १२ वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेते सुपरस्टार अंकुश चौधरी यांचे उपस्थित मान्यवरांकडून विशेष सत्कार करण्यात आला

आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की,
परीक्षेतील गुणांमुळे आत्मविश्वास द्विगुणीत होतो. चांगल्या गुणांना चांगल्या आचरणाची जोड द्या. आपल्या ज्ञानातुन तालुक्याचे नाव केवळ देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर उज्वल करा असा सल्ला दिला.
प्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार अंकुश चौधरी म्हणाले की, ज्या गुणवंतांचा सत्कार झाला त्या गुणवंतांनी ज्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांचे गुण वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, आमदार काळे यांच्या संकल्पनेतून पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित केलेला गुणवंतांचा सत्कार सोहळा कौतुकास्पद कार्यक्रम आहे. तसेच यावेळी त्यांनी २३ वर्षापूर्वी कोपरगावला आलेल्या आठवणींना उजाळा देवून त्यावेळी रंगमंचावर घडलेल्या गमती जमती सांगितल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, चारुदत्त सिनगर, नवाज कुरेशी, सौ.प्रतिभा शिलेदार, सौ. वैशाली आभाळे, धरमचंद बागरेचा, दिलीप बोरनारे, सुधाकर दंडवते, गोरक्षनाथ जामदार, देवेन रोहमारे काळे उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन, आजी माजी संचालक, जिल्हा परिषद,पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक ॲड.विद्यासागर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण चंद्रे, सौ.विमल राठी यांनी केले .
Post Views:
280





