कोपरगांव कन्या – डॉ. मनिषा नेने डीआयएटीत  संगणक व गणित विभाग संचालिका  

कोपरगांव कन्या – डॉ. मनिषा नेने डीआयएटीत  संगणक व गणित विभाग संचालिका  

Kopargaon Kanya – Dr. Manisha Nene Director of Computer and Mathematics Department at DIAT

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 11 June24 16.50 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगांव  :कोपरगांव कन्या डॉ. मनीषा जितेंद्र नेने हया शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यानंतर संजीवनीत अभियांत्रिकीचे शिक्षण तर पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे पुर्ण करून त्या सध्या पुणे डीआरडीओच्या डिफेन्स इन्स्टीटयूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये संगणक व गणित विभागाच्या संचालिका म्हणून काम पहात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. नरेंद्र चंदुलाल व्यास यांच्या त्या कन्या तर प्रभाकर नेने  यांच्या सूनबाई आहेत.

          डॉ. मनिषा जितेंद्र नेने यांनी आतापर्यंत १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर प्रसिद्ध केले आहे आहे. अमेरिका, स्वित्झर्लंड, मोरोक्को आदि ठिकाणच्या अंतरराष्ट्रीय परिषदांमधून त्यांनी सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ७ पेटंटसाठी प्रस्ताव दाखल केले असुन त्यापैकी एक पेटंट मंजुर झाले आहे. त्या सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग, एआम, कॉन्टम कॉम्प्युटर, सेंसर नेटवर्क आदि विषयात पारंगत आहे. कोपरगांवकरांना त्यांचा कार्यकर्तृत्वाचा अभिमान असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page