गणेश :निवडणूकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंना अमृत संजीवनीचादे धक्का;१८वि.१ 

गणेश :निवडणूकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंना अमृत संजीवनीचादे धक्का;१८वि.१ 

Ganesh: Revenue Minister Radhakrishna Vikhena is shocked by Amrut Sanjeevina in the elections; 18 vs. 1

पुन्हा एकदा गणेश पॅटर्न डंका; थोरात कोल्हे गटाकडुन विखेंची ८ वर्षांची सत्ता खालसाGanesh Pattern Danka once again; Vikhe’s 8-year rule was overthrown by the Kolhe group in Thorat

 
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon19 June24,21. 00Pm By राजेंद्र सालकर
 

कोपरगाव : गणेशनगर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत  अमृत संजीवनीचा दे धक्का; भाजपाचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पॅनलला दारुण पत्करावा लागला आहे. त्यांच्याच विरोधी गटातून काँग्रेसचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात भाजपचे विवेक कोल्हे  यांच्या समविचारी गटाने  या निवडणुकीत  १८ जागांवर दणदणीत विजय मिळविला असून सत्ताधारी गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले. पुन्हा एकदा  माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या गणेश पॅटर्नचा नातू विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डंका वाजला; थोरात कोल्हे गटाकडुन विखेंची ८ वर्षांची सत्ता खालसा

काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे   यांच्यात काही मुद्यांवर राजकीय तडजोड झाल्याचे चित्र आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राजकारण बाजुला ठेवत असल्याची भूमिका घेत  थोरात कोल्हे यांनी काही निर्णय घेतले. यानंतर गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत घवघवीत यश मिळवले.
 गणेश कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत विजय मिळविल्यानंतर बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही गणेश कारखाना निवडणुकीत आलो याचे कारण आम्हाला तुमचे गतवैभव परत द्यायचे आहे. गणेशच्या निमित्ताने  आम्ही तुम्हाला तुमचे अधिकार हक्क मिळवून देणार आहे.आमची जबाबदारी पाठिंबा देऊन ताकद देण्याची आहे तुम्ही सभासद बांधवांनी ही निवडणूक हातात घेतली  त्यातूनच हा विजय घडला आहे असा मला विश्वास आहे 
 युवानेते विवेक कोल्हे म्हणाले, स्व.कोल्हे साहेबांची छबी आपल्यात दिसते असे अनेक जणांनी प्रचारा दरम्यान बोलून दाखवले त्यांना सर्वांना माझा हाच विश्वास आहे. की या निवडणुक म्हणून नाहीतर मी तुमच्या न्याय हक्कासाठी आलो आहे.आमची थोरात कोल्हे युती ही अमृत संजीवनी आहे.गणेश कारखाना कितीही अडचणीत असेल तरीही मी व बाळासाहेब थोरात  गणेशला  उर्जितावस्थेत  आणणारच  हा विश्वास ठेवा.  श्री गणेश निवडणुकीतील  हा  विजय क्रांती करणारी नांदी आहे.  

गणेश  कारखाना वाचविण्याच्या दृष्टीने ही निवडणूक सभासदांनी हातात घेतली होती. ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप न करणे, कामगारांच्या पगारी न देणे या सर्वच बाजूंनी सत्ताधाऱ्यावर रोष होता. तो रोष मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केला.- नारायण कार्ले

Leave a Reply

You cannot copy content of this page