दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा; स्नेहलता कोल्हे

दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करा; स्नेहलता कोल्हे 

Thoroughly investigate the suspicious death of Darshana Pawar; Snehlata Kohle

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed21June24,16.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : रविवारी (१८ जून) दर्शना पवार हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ या परिसरात सापडला. तिचा मृत्यू संशयास्पद असून याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी   उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी (२१जुन) रोजी  प्रत्यक्ष भेटून त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संजीवनी उद्योग समूहाचे कर्मचारी दत्ता पवार यांची  सुकन्या दर्शना पवार (२६ ) हिने एमपीएससी) परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता व तिची परिक्षेत्र वन अधिकारी (आरएफओ) पदी निवड झाली होती.  पुण्यातील एका संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभासाठी दर्शना पवार ही ९ जून रोजी कोपरगाव येथून पुण्याला गेली होती. हा सत्कार समारंभ पार पडल्यानंतर ती पुण्याजवळील नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे राहत होती. १२ जून रोजी सिंहगडावर फिरायला जात असल्याचे मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने आपल्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली होती. दर्शना हिच्यासोबत तिचा एक मित्रदेखील होता. १२ जूनला दर्शनाच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर तिचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली.
रविवारी (१८ जून) दर्शना पवार हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ या परिसरात सापडला.  तरुण  प्रतिभावान दर्शना पवार हिच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावून गेले. दर्शना पवार हिचा मृत्यू संशयास्पद असून,  दर्शनाचा घातपात झाला असावा, असा तिच्या कुटुंबीयांना संशय असून, तसे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करून दर्शनाच्या मृत्यूचे गूढ उलगडावे व सत्य समोर आणावे, दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी करून आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी व तसे निर्देश पोलिसांना द्यावेत,अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरूवारी (२१जुन) रोजी  प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे  केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page