दर्शना पवारच्या मारेक-याला फाशी  द्या; माझ्या मुलीला मीच न्याय देते, आईची संतप्त प्रतिक्रिया

दर्शना पवारच्या मारेक-याला फाशी  द्या; माझ्या मुलीला मीच न्याय देते, आईची संतप्त प्रतिक्रिया

Hang Darshana Pawar’s killer; I am the one who judges my daughter, reacts the angry mother

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu22June24,20.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : दर्शना पवार हिच्या मारेकऱ्याला गुरुवारी अटक करण्यात आल्यानंतर  आपल्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या त्याने माझ्या मुलीची जशी हत्या केली तशी त्याची हत्या मला करायची आहे मला फक्त तिला न्याय द्यायचा आहे मीच न्याय देते असे संतप्त भावना  दर्शना पवार हिची आई सुनंदा पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केल्या,

दर्शना हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हांडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर पोलीस तपासात दर्शना राहुल हांडोरेसोबत राजगडला गेल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालात दर्शनाची हत्या झाल्याचे समोर आले होते.गुरुवारी राहुल हांडोरेला पुणे ग्रामीण पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे 
यावेळी सुनंदा पवार म्हणाले”जशी माझ्या मुलीची हत्या केली तशी त्याची हत्या करायची आहे मला फक्त तिला न्याय द्यायचा आहे मीच न्याय देते त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अजून दहा मुलींचे नुकसान होण्यापेक्षा तो राहिला नाही पाहिजे  त्यांची मैत्री जास्त नव्हती ते फक्त अभ्यासावर चर्चा करत होते त्याने फसवून तिला नेले त्यानंतर त्याने तिचा घात केला.
तिची क्रूर हत्या झाली तिला न्याय भेटला पाहिजे त्या  आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी दर्शना पवार हिचा (भाऊ) अभिषेक पवार यांनी केली, त्याच्याशी नातेवाईक असल्याचा आमचा कुठलाही संबंध नाही असेही तो म्हणाला,

Leave a Reply

You cannot copy content of this page