चर्चा तर होणारच ना? पाठीवर कौतुकाची थाप; आणि सर्वतोपरी मदतीची ग्वाही –  देवेंद्र फडणवीस

चर्चा तर होणारच ना? पाठीवर कौतुकाची थाप; आणि सर्वतोपरी मदतीची ग्वाही –  देवेंद्र फडणवीस

There will be a discussion, right? A pat on the back; And assurance of all help – Devendra Fadnavis

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu22 June24,20.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : विवेक कोल्हे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत सहकारात काम करतांना पक्षविरहीत भूमिका ठेऊन भाजपा युती सरकार नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे पाठीशी असून आगामी काळात श्री गणेश कारखाना जोमाने चालण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२१जुन) दिली. चर्चा तर होणारच ना?तसेही राजकीयदृष्ट्या या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. 

श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व भाजपाचे विवेक कोल्हे एकत्र आल्याने  चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र शेतकरी कष्टकरी यांची कामधेनु असणारा कारखाना टिकला पाहिजे या उदात्त हेतूेने आपण एकत्र आल्याचे  म्हणत कोल्हे थोरात व्दयीने या चर्चेला पूर्णविराम दिला.
परंतु अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या
राहता तालुक्यातील श्री गणेश कारखाना निवडणूकीत कोल्हे – थोरात युतीने विखे यांच्या होम पीचवरच त्यांना पराभवाचा झटका दिल्यामुळे  ही निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.
 माजी आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी श्री गणेशच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांना घेऊन बुधवारी (२१जून) रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली आणि चर्चेला पुन्हा हवा दिली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व  नवनिर्वाचित संचालक मंडळाचे  कौतुक व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 
यावेळी ना.चंद्रकांत पाटील, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे आणि ज्यांच्या भोवती या निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अशी महत्वाची भूमिका पार पाडणारे युवानेते विवेक कोल्हे हे उपस्थीत होते. 
 या प्रसंगी गणेश  कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, विजय  दंडवते, संपत हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, सुधीर लहारे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, अरविंद फोपसे आदी उपस्थित होते.

चौकट – गणेश च्या निवडणुकीचे पडसाद राज्यभर उमटत असताना  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा  व  युवा नेते विवेक कोल्हे यांच्या पाठीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कौतुकाची थाप मग चर्चा तर होणारच ना ?

Leave a Reply

You cannot copy content of this page