अपघाती निधन झालेल्या रिक्षा चालकाचे कुटुंबाला अडीच लाख ; अध्यक्षांच्या हस्ते धनादेश

अपघाती निधन झालेल्या रिक्षा चालकाचे कुटुंबाला अडीच लाख ; अध्यक्षांच्या हस्ते धनादेश

Two and a half lakhs to the family of the rickshaw driver who died in an accident; Checks in the hands of the President

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu22 June24,20.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : रस्ता अपघातामध्ये निधन झालेल्या  कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे सभासद बाळासाहेब पंढरीनाथ बारसे यांच्या कुटुंबाला विम्याचे २ लाख ४० हजार रुपयांचा धनादेश कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा पतसंस्थेने दिला.

हा धनादेश मयत बाळासाहेब बारसे यांच्या पत्नी हर्षदा बाळासाहेब बारसे,मुलगा मनोज बाळासाहेब बारसे यांनी गुरुवारी (२२जुन) रोजी  रिक्षा  पतसंस्था कार्यालयात संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र सालकर  यांच्या हातून स्वीकारला. याप्रसंगी रिक्षा पतसंस्थेचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर सिनगर, योगेश झांबरे, रवींद्र चांदर  यांच्यासह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
येथील कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे सभासद बाळासाहेब पंढरीनाथ बारसे यांचा  दोन महिन्यांपूर्वी दुर्दैवाने २४ एप्रिल रोजी अपघाती  मृत्यू झाला. संघटनेने सभासदांच्या काढलेल्या ग्रुप इन्शुरन्स मधून  त्यांच्या वारसाला २ लाख ४० हजाराचा धनादेश देऊन संकटात मदत केली. यामुळे मयत रिक्षा चालकाच्या कुटुंबियांना संकटकाळी रिक्षा संघटनेचा मोठा आधार मिळाला असल्याचे भावना  वारसांनी व्यक्त केल्या आहेत.
विमा मुदत संपण्यास काही दिवसच शिल्लक असताना त्यांचं अपघाती निधन  झालं , ३०० रुपयांच्या विम्यानं कुटुंबाला  २ लाख ४० हजार रुपये मिळाले !

Leave a Reply

You cannot copy content of this page