कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांचा अभाव- ठाकरे शिवसेना 

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांचा अभाव- ठाकरे शिवसेना 

Lack of facilities for farmers in Kopargaon Agricultural Income Market Committee- Thackeray Shiv Sena

मतदार शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचा हा पाठपुरावाThis is a follow up to the word given to the voters farmers

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir23 June24,15.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : जिल्हात मोठी  बाजार समिती, असा नाव लौकिक प्राप्त असलेल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधांचा मात्र अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची  प्रचंड गैरसोय होत असून शेतकऱ्यांना तातडीने सुविधा पुरविण्यात याव्या, अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन  करण्यात येईल, असा इशारा  कोपरगाव शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (२३ जून) रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आला असून याबाबत सभापती साहेबराव रोहोम यांना निवेदन देण्यात आले आहे.

हे निवेदन म्हणजे बाजार समिती  निवडणुकीत शेतकरी मतदारांना दिलेल्या शब्दाचा पाठपुरावाच असल्याचे म्हटले आहे

या निवेदनात सध्या रब्बी हंगामातील लाल कांदा आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिवस अगोदर रात्री मुक्कामी यावे लागत आहे. मात्र,  येथे आलेल्या शेतकरी बांधवांसाठी भोजनाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विद्यतु दिवे फक्त शोभेसाठीच असून संपूर्ण बाजार समिती आवार काळोखात असतो.त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारातच वावरावे लागते. झोपण्यासाठी निवारा उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना  वाहनांच्या आश्रयाला झोपावे लागते. बाजार समिती आवारातील शौचालय बंद असून प्रात:विधी साठी उघड्यावर जावे लागते. आंघोळीसाठी कोणतीही सोय नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. बाजार समिती आवारात  कॉक्रेटीकरण करणे, सुलभ शौचालय दुरूस्ती किंवा नव्याने उभारणे, कष्टकरी शेतकरी, व्यापारी आणि हमाल हितासाठी नवीन धोरण अथवा तरतूद करण्यात यावी, बैल बाजार, चमडा बाजार, फळ भाजीपाला लिलाव याठिकाणी मोठ मोठे शेड उभारून कॉक्रेटीकरण करावे, 
आवारातील गटारी मोठया प्रमाणात तुंबल्यामुळे सर्वत्रआवारातील गटारी मोठया प्रमाणात तुंबल्यामुळे सर्वत्र दुर्गधी पसरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डास तयार झाले असून डासांमुळे शेतकरी बांधव, व्यापारी वर्ग यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी एकही सुरक्षा रक्षक व सी. सी. टीव्ही नसल्यामुळे वारंवार शेतमाल व वाहनांचे भाग चोरी होण्याच्या घटना घडत आहेत.
बैल बाजारचे वसुली टेंडर काढून त्याचा कायदेशीर ठेका देण्यात यावा, बैल बाजार मध्ये खरेदी विक्री साठी आलेल्या जनावरांना गाडीतून खाली उतरवण्यासाठी कठडा किंवा रँप करावा जेणेकरून जनावरांना ईजा होणार नाही व कसरतही करावी लागणार नाही, तसेच जनावरांना पिण्यासाठी पाण्याचे नियोजन करावे, भुसार मालाच्या कार्यक्षेत्रात सर्व व्यापाऱ्यांना समान जागा व्यापारासाठी वाटप करण्यात यावी, कांदा लिलावासाठी स्वतंत्र जागा मंजूर झालेली असून त्याची कागदपत्रे पुर्तता त्वरित करावी आणि ती जागा ताब्यात घेवून तात्काळ कांदा लिलाव त्याठिकाणी सुरू करण्यात यावा, तालुक्यातील सर्व भुसार मालाची खरेदी विक्री ही कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात व्हावी हे बाजार समिती हितासाठी सक्तीचे करावे असे निवेदनात नमूद केले आहे. 
 शहरप्रमुख सनी वाघ यांनी  पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यात बाजार समिती आवारातील सोयी सुविधांचा अभाव त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत त्यांनी सचिव नानासाहेब रणशुर यांच्याशी संपर्क साधत सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली.याबाबत शेतकरी बांधव व शिवसेनेच्यावतीने  सभापती , व सचिव,कृषी उत्पन्न समिती कोपरगाव यांना निवेदन देऊन बाजार समिती प्रशासनास सूचना करून, सर्व सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
वरील मागण्यांची दखल घेऊन आठ दिवसात शेतकरी बांधवांसाठी सुविधा उपलब्ध करून न दिल्यास ठाकरे शिवसेनेच्यावतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख  सनी वाघ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे   या निवेदनावर शहर प्रमुख सनी वाघ, उत्तर जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे , उपजिल्हाप्रमुख असलम शेख,  एसटी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे, तालुका समन्वयक मुन्ना मन्सुरी युवा सेनेचे गणेश कृष्णा जाधव उपशहर प्रमुख बालाजी गोर्डे, आकाश कानडे, सिद्धार्थ शेळके, रवींद्र  कथले, नितेश बोर्डे, अमोल शेलार, दीपक चव्हाण, महेंद्र परदेशी यांसह शेतकऱ्यांनी दिला आहे.

कोट

बाजार समितीच्या निवडणुकीत ज्यावेळी ठाकरे शिवसेना म्हणून  शेतकरी मतदारांच्या दारात गेलो त्यावेळेस  बाजार समिती आवारातील  सोयींच्या अभावामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी  बाजार समितीचा कारभार व सोयी सुविधां अभावाचा पाढाच आमच्यासमोर वाचला होता त्यावेळेस  निवडणुकीत जय पराजय काहीही हो परंतु तुमच्या मागण्यांचा पाठपुरावा करणारच असा शब्द ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता त्याचा पाठपुरावा म्हणून आम्ही आंदोलन सुरू केले आहे – भरत मोरे, एसटी कामगार सेना अध्यक्ष 

 
 

कोट 

ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज शुक्रवारी कोपरगाव बाजार समितीला बाजार समितीतील सोयी सुविधांच्या अभावाबाबत देण्यात आलेल्या निवेदनातील मागण्या रास्त असून त्या मागण्या सभागृहापुढे ठेवण्यात येऊन तातडीने त्यावर निर्णय घेऊन ती कामे केली जातील- सभापती साहेबराव  रोहोम

Leave a Reply

You cannot copy content of this page