कोपरगाव शहरातील मंजूर निधीचे कामे पूर्ण करा- राष्ट्रवादी काँग्रेस 

कोपरगाव शहरातील मंजूर निधीचे कामे पूर्ण करा- राष्ट्रवादी काँग्रेस 

Complete sanctioned fund works in Kopargaon city- Nationalist Congress

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 June24,18.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहराच्या विकासासाठी मंजूर असलेल्या निधीतील अनेक कामे अपूर्णावस्थेत असून हि कामे तातडीने पूर्ण करा अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे केली.

कोपरगाव-धारणगाव रोड पूर्ण होवून एक वर्ष देखील झाले नसतांना या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघातास आमंत्रण देत असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे हा खड्डा तातडीने बुजवावा. तसेच कोपरगाव शहरातील अनेक जुन्या पाईप लाईनला गळती लागली असून त्यामुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या पाईप लाईनची तातडीने दुरुस्ती करावी अशा अनेक मागण्या   केल्या आहेत.     

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्ष सौ. वैशाली आभाळे,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, जिल्हा सचिव सौ.रेखा जगताप, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, सौ माया खरे. फकीर कुरेशी, कृषी  बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, दिनकर खरे, प्रकाश दुशिंग, हारून शेख, शैलेश साबळे, अशोक. आव्हाटे मनोज नरोडे, संदीप सावतडकर, वाल्मीक लाहिरे,जनार्दन शिंदे, हर्षल जयस्वाल, तेजस साबळे शशिकांत देवकर, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैरनार, चंद्रशेखर म्हस्के, शुभम लासुरे योगेश नरोडे, बाळासाहेब बारसे, अमोल आढाव, सौ. भारती शिंपी कु. दीक्षा उनवणे, सौ.रूपाली कळसकर, सौ. शितल वयाखिंडे, सौ.शितल लोंढे, धनंजय कहार, शिवा लकारे,शंकर घोडेराव, विकास.बेंद्रे, अजीज शेख, ऋषिकेश खैरनार, आकाश डागा आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page