झगडे फाटा चौकात पुन्हा गांधींजीचा पुतळा बसवा -नितीन शिंदे
Put Gandhi’s statue again in Jagade Fata Chowk – Nitin Shinde
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 June24,18.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मुंबई शिर्डी व समृद्धी महामार्ग यामुळे दुर्लक्षित झालेल्या झगडे फाटा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाची पुनर्स्थापना करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी केली आहे.

याबाबत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे हि मागणी केली आहे. पोहेगाव येथील पोहेगांव खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित. तत्कालीन चेअरमन स्वर्गीय संजय रामराव रोहमारे यांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर १९९४ साली तात्कालीन आमदार दादा शहाजी रोहमारे यांच्या पुढाकारातून झगडे फाटा येथील चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता.स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते आमदार दादा शहाजी रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मी स्वतः या समारंभास उपस्थित होतो. पोहेगाव परिसरात झगडे फाटा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा स्थापित झाल्यामुळे दादा शहाजी रोहमारे उर्फ नानांचे बापूजी अर्थात महात्माजींबद्दलचे प्रेम हे फार मोठे होतं त्यामुळे नानासह आमच्या सारख्या सर्व काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते लोकांसाठी ही गौरवाची बाब झाली होती. महामार्गाच्या कामात या पुतळ्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाच्या अस्तित्वतेवर आघात करण्याचा प्रकार आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत शासकीय सन्मानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा झगडे फाटा चौकात मोठ्या दिमाखात व सोहळ्यात पुन्हा पुतळा प्रस्थापित करा. अन्यथा आम्हाला सध्याच्या लोकशाही व महात्मा गांधीजींच्या अहिंसा मार्गाने सत्याग्रह, उपोषण करावे लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून नितीन शिंदे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिला आहे .
सदर निवेदन शनिवारी (२४ जून) रोजी मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सदाशिव लोखंडे यांना पाठविले आहे.
या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस सुनील साळुंखे, विजयराव जाधव, उपाध्यक्ष जिल्हा किसान सेल, चंद्रकांत बागुल, राहुल गवळी, रौनक अजमेरे, सचिन होन, महादेव नाना जगताप, ज्ञानेश्वर भगत, चंद्रहार जगताप, आधीच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत





