जवाहर नवोदयसाठीनिवडीची पंधरा वर्षाची परंपरा कायम; आत्मा गुरूकुलच्या दोघांची निवड”
Fifteen years tradition of selection for Jawahar Navodaya continued; Choice of both of Atma Gurukul”
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat24 June24,16.30Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगांव: जवाहर नवोदय परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या करण चारवंडे व शिवम वायखिंडे या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सलग पंधराव्या वर्षी आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून आजपर्यंत ७५ विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झाली आहे. अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन, जादा वर्ग, नैदानिक चाचण्या, सराव चाचण्या, या शिवाय विद्यार्थी व शिक्षकांची अपार मेहनत यामुळे हे यश मिळाले आहे. वर्षभर मिशन गरुडझेप राबविल्याने हे उद्दिष्ट साकार झाले असे प्राचार्य निरंजन डांगे यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यानां विभाग प्रमुख अनिल सोनवणे, सागर अहिरे, सचिन डांगे, रमेश कालेकर, रविंद्र देठे, मीना नरवडे, बाळकृष्ण दौंड, विषय शिक्षक अनिल सोनवणे, दिपक चौधरी, प्रियंका चौधरी, संतोश भांड, रुपाली चव्हाण यांचे मागदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, प्राचार्य निरंजन डांगे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदिंनी अभिनंदन केले.