विजेता मंडळाकडून शहरातील विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर बॅगचे वाटप
Distribution of notebook bags to needy students from various schools in the city by the Vijeta board
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun25 June24,19.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही शालेय दप्तर बॅगचे यावर्षीही विजेता तरुण मंडळातर्फे ‘एक दप्तर मोलाचे’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत शहरातील विविध शाळेतील सर्व २५० विद्यार्थ्यांना दप्तर बॅगचे वाटप केले.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पत्रकारांच्या हस्ते दप्तर बॅग चे वाटप करण्यात आले वाटप केले.
विजेता मंडळाचे अध्यक्ष गणेश आढाव म्हणाले की, गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना सरकारकडून वह्या पुस्तके मोफत मिळतात परंतु दप्तर बॅग मात्र मिळत नाही ही गोष्ट लक्षात घेऊन त्याच्या शिक्षणाला छोटासा हातभार लागावा म्हणून गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विजेता तरुण मंडळांनी एक दप्तर बॅग हा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवला आहे.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त तेरा बंगले रोड वरद विनायक मंदिर येथे विजेता तरुण मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला
विजेता तरूण मंडळ स्थापना १९८८ साली झाली.तेंव्हा पासुन मंडळाने सलग पाच वर्ष गणेश उत्सव मिरवणुकीचा प्रथम पुरस्कार मिळाला याबरोबरच अनेक शासकीय पुरस्कार देखील मिळविले आहेत आज रोजी दक्षिणात्य पद्धतीचे भव्य असे मंदिर उभारून मंडळाच्या वतीने गणेश उत्सवाबरोबरच वर्षभर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम रक्तदान शिबिर, लसीकरण, दर शनिवारी सायंकाळी सामुदायिक हनुमान चाळीसा, दर गुरुवारी त्रिपदी, दररोज सायंकाळी पाच वाजता हरीपाठ, पहाटेची भावगीत, तर चतुर्थी ला साबुदाणा खिचडी वाटप आदित्य नैमैतिक कार्यक्रम सारखे चालू असतात.
यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, विजेता तरुण मंडळाचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा व पालकांना प्रोत्साहन देणार आहे मदतीच्या माध्यमातून प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर विकास होण्याला वेळ लागणार नाही असे ते म्हणाले
यावेळी बोलताना पत्रकार राजेंद्र सालकर म्हणाले, गेल्या साडेतीन दशकापासून विजेता तरुण मंडळ या ठिकाणी या भागात सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम करीत आहे पहिल्यांदाच त्यांनी शालेय दप्तर वाटपाचा कार्यक्रम घेऊन अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. या मंडळाच्या सभासदांनी या भागातील नागरिकांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे त्यामुळे या मंडळाचे अध्यक्ष गणेश आढाव हे एकदा नगरसेवक झाले, एकदा उपनगराध्यक्ष झाले आता या मंडळाच्या सभासदाला नगराध्यक्ष होण्याची संधी आहे असेही ते म्हणाले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र सुपेकर स्वागत कैलास गवारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव भवर, मनोज गवारे, वैभव सोनावणे, नईम शेख, राजू सुपेकर, ऋषीं बारहाते संदीप कुलकर्णी, सागर वर्मा, विशाल निकम, शंकर देवकर, अनय आढाव, मोहित गवारे, नील आढाव, शिरीष राजपूत, निकेतन आढाव, दादू जाधव, राहुल बोरावके, सनी सुपेकर या मंडळाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
व शेवटी आप्पासाहेब नवले यांनी आभार यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
Post Views:
233