एक तपानंतर आत्मा मालिक हॉस्पिटलने टाकली कात; जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आरोग्य सुरक्षा कार्ड नंदकुमार सूर्यवंशी
After a penance, Atma Malik Hospital dropped the thread; Health Security Card Nand Kumar Suryavanshi for Journalists in District
आत्मा मालिक : गोरगरीबांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून देणारे विस्तारित…….
१०० बेड्स, अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि आयसीयू व एनआयसीयूची सुविधाAtma Malik : Expanded providing up-to-date medical facilities to the poor at nominal rates.
100 beds, state-of-the-art operation theater and ICU and NICU facilities
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue27 June24,21.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गोरगरीबांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा मोफत व माफक दरात उपलब्ध करून देणारे विस्तारित आत्मा मालिक हॉस्पिटल ने एक तपानंतर कात टाकली आहे. आता
नवी उभारी घेऊन विस्तारित,१०० बेड्स, अद्ययावत ऑपरेशन थिएटर आणि आयसीयू व नवजात बालकांना एनआयसीयूची सुविधा कार्यान्वित करण्यात आले आहेत. ट्रस्ट स्वतः हॉस्पिटल चालविणार असून सेवाव्रत हॉस्पिटल च्या माध्यमातून रुग्णसेवा देणार असल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी मंगळवारी (२७जुन) रोजी सकाळी ११ वाजता आत्मा मलिक हॉस्पिटल कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी स्वागत व प्रस्तावना ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी केले
अधिक माहिती देताना नंदकुमार सूर्यवंशी पुढे म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वर्तमानपत्राच्या व सोशल मीडिया डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकार बंधू व त्या विभागाचे कर्मचारी यांच्यासाठी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर परम पूर पूज्य सद्गुरु गुरुमाऊलीच्या आदेशाने आत्मा मालिक आरोग्य सुरक्षा योजना सन २०२३- २४ साठी दिनांक एक जुलै ते सात जुलै दररोज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत योजना सहभाग व सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे
आत्मा मलिक आरोग्य सुरक्षा योजना 2023 24 यामध्ये ओपीडी व आयपीडी मोफत शासनाच्या सर्व आरोग्य योजना मधून मिळणारा लाभ अधिक आत्मा मलिक आरोग्य योजनेतून रुपये 25000 प्रति व्यक्ती अतिरिक्त लाभ वयाची आठ नाही पत्रकार बंधू व पत्रकार बंधूंचे कुटुंबीय आई वडील पत्नी व मुले सहा जणांना सर्व योजनेस सहभागी करून घेतले जाणार आपत्कालीन परिस्थितीत मोफत ऍम्ब्युलन्स सेवा देण्यात येणार रुग्णाबरोबर एक नातेवाईक यांना निवास व बोलण्याची मोफत सुविधा औषधांमध्ये सर्व प्रकारच्या लॅब टेस्टमध्ये पन्नास टक्के सूट तर एक्सप्रेस सिटी स्कॅन यूएसबी व तत्सम रेडिओ लॉजिकल तपासण्यावर 40% सूट देण्यात येणार असल्याची माहिती विश्वात्मक आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली
डॉ. नितीन पाटील हॉस्पिटलमध्ये सध्या कार्यान्वित करण्यात आलेल्या विभागाबद्दल माहिती देताना म्हणाले हृदयरोग विभाग, युरो सर्जरी विभाग, अस्थिरोग विभाग, बालरोग विभाग, डायलिसिस विभाग, मेंदूरोग विभाग, नेत्ररोग विभाग, कर्करोग विभाग, कान नाक घसा विभाग, अति दक्षता विभाग, अपघात विभाग, दंतरोग विभाग, फिजिओथेरपी विभाग सुरू करण्यात आले आहेत. अतिदक्षता व अपघात हे दोन विभाग २४ तास सुसज्ज राहणार आहेत. अपघात विभागासाठी सहा बेड व एक मायनर ओटी, बालविभाग साठी २० बेड नवीन अत्याधुनिक पद्धतीचे, आयसीयू विभागात २१ बेड क्षमता, जनरल वार्ड विभाग ३५ बेड क्षमता, स्पेशल रूम १८ बेड क्षमता, सर्व मिळून १०० बेड क्षमता करण्यात आली आहे तसेच अस्थिरोग चिकित्सा,सांधेरोपण गुडघा खुबा प्रत्यारोपण कमी खर्चात करण्यात येणार आहे.सेवाव्रत धतीर्वर उभे राहिलेल्या या आधुनिक हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. डॉ नितीन पाटील यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेसाठी आत्मा मलिक ट्रस्टचे प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे प्रकाश गिरमे, डॉ. अविनाश पवार (एमडी), डॉ. नितीन पवार (सीईओ) डॉ. तुषार पाटील, डॉ. अनिकेत सोनवणे (मेडिकल मॅनेजर) सुनील पोकळे (मॅनेजर) सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड (नेत्ररोगतज्ञ), शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, समन्वयक ज्ञानेश्वर जाधव, महेश गायधने,अक्षय कुंर्डे, संजीवनी ब्लड बँकेच्या डॉ. नीता पाटील उपस्थित होत्या.
एका प्रश्नावर उत्तर देताना अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले सेवाव्रत धर्तीवर ना नफा ना तोटा या तत्त्वावर हॉस्पिटल चालविणे दीनदुबळे गरीब व सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाची माफक व अल्प खर्चात परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा ट्रस्ट चा मानस आहे अर्थकारण दरम्यान, या अवाढव्य हॉस्पिटलचा मेंटेनन्स हे आता मोठे आव्हान ठरणार आहे. मोफत व माफक दरात आधुनिक वैद्यकीय सुविधा पुरविणे आर्थिकदृष्ट्या किती काळ शक्य होईल, हा प्रश्न आहे. त्यामुळे अल्प मोबदला व माफक दराच्या धर्तीवर येथील दर निश्चित करण्याचा विचार आहे. सध्याच्या दरापेक्षा काहीसे जास्त, परंतु, सर्वसामान्यांना परवडतील, असे दर लागू केल्यास हा प्रकल्प स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करू शकेल, असे सूर्यवंशी म्हणाले म्हणाले.