श्री गणेशचे कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे तर व्हा. चेअरमन विजय दंडवते 

श्री गणेशचे कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे तर व्हा. चेअरमन विजय दंडवते 

Sudhir Lahare is the chairman of Shri Ganesha’s factory. Chairman Vijay Dandawat

 विवेक कोल्हे यांनी तज्ञ संचालक बनावे-थोरातVivek Kolhe should be made an expert director – immediately

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed28 June24,17.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे  चेअरमन पदी सुधीर वसंतराव लहारे  तर व्हा चेअरमन पदी विजय भानुदास दंडवते  यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आज चेअरमन, व्हा चेअरमन पदाची निवड निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी  माणिक आहेर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्यासह सर्व संचालक, सभासद,नागरिक,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.बाळासाहेब थोरात म्हणाले,  आगामी काळात विवेक कोल्हे आणि आमच्यावर एक प्रकारची जबाबदारी आहे याची आम्हाला जाणीव आहे.श्री गणेश कारखाना हा धार्मिक स्थळाप्रमाणे आमच्यासाठी पवित्र आणि पूजनीय आहे असे आम्ही मानतो त्यामुळे कोण कोणत्या राजकीय पक्षाचे हे न बघता सभासद आणि शेतकरी हेच सर्वस्व मानून या कारखान्याची घडी बसवण्याची आमची कार्यपद्धती असेल. शिस्त,नियम,ताळेबंद,एकोपा या आधारावर नवीन संचालक मंडळ काम करेल असा विश्वास आहे.व्यक्त केला 
 सौ.स्नेहलता कोल्हे यांनी माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त केले .विवेक कोल्हे यांनी अतिशय कमी वयात एक धाडसी निर्णय घेतला त्या निर्णयाला साथ देऊन आशीर्वाद देण्याचे काम सर्वांनी केले त्यांचे आभार मानले. राजकीय पक्ष विसरून सर्वजण केवळ गणेश कारखाना आणि परिसर याचा विकास व्हावा या भावनेने सर्वजण एकत्र आले यात खरा सहकार आहे असे मी मानते.आगामी काळात कारखाना उत्तम रीतीने चालविण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारखाना कामकाजात सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत असे सांगितले असल्याचे सौ.कोल्हे म्हणाल्या
 याप्रसंगी शिवाजीराव कोते, सुधीर म्हस्के, धनंजय जाधव,संजय शेळके,चंद्रभान धनवटे, चंद्रभान गुंजाळ,भागवत चोळके, सर्जेराव जाधव,अशोकराव दंडवते,महेंद्र शेळके,दिलीप क्षीरसागर,भाऊसाहेब थेटे,संजय सरोदे, रावसाहेब बोठे,डॉ.वसंत लभडे,श्रीकांत मापरी,सुहास वहाडणे,नानासाहेब शेळके, गंगाधर गमे,ज्ञानेश्वर वर्पे,राजेंद्र लहारे,गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ॲड. नारायणराव कार्ले, डॉ. एकनाथ गोंदकर, गंगाधरनाना चौधरी, ‘गणेश’ चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, नूतन संचालक बाबासाहेब डांगे, संपतराव हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, नानासाहेब नळे, अनिल गाढवे, गंगाधर डांगे, विष्णुपंत शेळके, संपतराव चौधरी, आलेश कापसे, शोभाबाई एकनाथ गोंदकर, कमलबाई पुंडलिक धनवटे, अरुंधती अरविंद फोपसे, अरविंद फोपसे आदींसह सर्व संचालक,गणेश परिसरातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट –

आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे विवेक कोल्हे आजच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही ही त्यांना आज सवलत देण्यात आली आहे परंतु यापुढे  त्यांना सवलत मिळणार नाही. कारखान्याच्या नियमित कामकाजात त्यांना लक्ष घालावे लागेल. दरम्यान गणेश कारखान्यामध्ये विवेक कोल्हे यांनी तज्ञ संचालक म्हणून कामकाजात सहभाग घ्यावा असे सूतोवाच बाळासाहेब थोरात यांनी केले.’

Leave a Reply

You cannot copy content of this page