अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी गुरुपौर्णिमा हा अमृतयोग – संत निजानंद Gurupurnima is Amrit Yoga to move from darkness to light – Sant Nijananda
आत्मा मालिक गुरूपौर्णिमा महोत्सवाची तयारी पूर्ण …. Preparations for Atma Malik Guru Poornima festival are complete….
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu29 June24,16.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: गुरुपौर्णिमा हा गुरु शक्तीचा अर्थात आत्मशक्तीचा उत्सव आहे पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देता तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरुची प्रार्थना करायची “अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठीचा’अमृतयोग’ म्हणजे “गुरुपौर्णिमा” उत्सव असल्याचे प्रतिपादन आत्मा मलिक ध्यान योग मिशनचे अध्यक्ष संत निजानंद महाराज यांनी गुरुवारी (२९जुन) रोजी दुपारी १ वाजता ध्यानमंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले.
आत्मा मलिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज म्हणाले,भाविकांना ध्यानाच्या माध्यमातून प्रत्येकाला त्याच्या हृदयातील परमेश्वराची ओळख करून देण्याचे महान कार्य परमपूज्य सद्गुरू आत्मा मलिक माऊली करत आहे प्रत्येक भाविकाला सद्गुरु माऊलीच्या प्रेमाची ओढ लागलेली असते गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर परमपूज्य माऊलीचे दर्शन भेटीचे साठी लाखो भाविक दरवर्षी येतात प्रत्येक मनुष्याच्या हृदयात नांदणारा आत्मा हाच परमेश्वर आहे ही शिकवण माऊलींनी दिली त्यामुळे येथे आलेल्या प्रत्येक भाविकांचे यथोचित आदरतिथ्य होणे आवश्यक आहे कारण ते प्रत्यक्ष परमेश्वराचे आदरतित्य असते परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊलींचे मागदर्शनाखाली सालाबादाप्रमाणे आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण येथे १ ते ३ जुलै दरम्यान आत्मा मालिक गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती संत परमानंद महाराज यांनी दिली.
यावेळी विवेकानंद महाराज म्हणाले भौतिक जीवनात माणसाला अट्टाहास करावा लागतो एकदा साधक केलं की सर्व साधलं जातं आत्म्याच्या श्रीमंतीपाठोपाठ बाह्य श्रीमंती येते अर्थात वर्तमानातून भविष्याची तयारी करणे हाच गुरु पौर्णिमेचा उद्देश आहे
गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त सत्संगा साठी ६० हजार चौ. फूट तर महाप्रसादासाठी ४०हजार चौ. फुटाचा मंडप उभारण्यात आला आहे. त्यात प्रशस्त व्यासपीठ व्यवस्था, अदयावत ध्वनिक्षेपण यंत्रणा तसेच एलईडी स्किनची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांचे सोईसाठी आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या वतीने महाप्रसाद स्वागत दर्शन वाहन व्यवस्था, पादत्राणे, सत्संग, वैद्यकीय सेवा, स्वच्छता, पाणी पुरवठा समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्या भाविकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत राहून भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी दक्ष राहातील • जवळपास दहा हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे भाविकांना तीन दिवसीय या गुरूपौर्णिमा ऊत्सवामध्ये निवासी सहभाग घेवून संतदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
१ जूलै रोजी पहाटे चार वाजता आत्मरूप पादूका पुजनाने हया महोत्सवाची सुरवात होणार होइल, सकाळी १० ते १२ या वेळेत ज्या भाविकांनी ४५ दिवसाचे उपवास केले आहेत अशा भाविकांचा अनुष्ठान विधी संत शांतीमाई यांचे करकमला द्वारे संपन्न होणार आहे. तिन दिवस चालणा-या या उत्सवा मध्ये काकड आरती, हरिपाठ, भजन, प्रवचन, सत्संगाचे कार्यक्रम होणार आहेत.
गुरूपौर्णिमा महोत्सवादरम्यान संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत सागरानंद महाराज संत प्रभावती माई संत स्मृती माई आदी संतगण आत्मप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणार आहे.
उत्सव कालावधीत २४ तास महाप्रसाद सुरू राहील यासाठी आश्रमाच्या वतीने ५१ पोते साखरेचा बूंदी प्रसाद तयार करण्याचे काम सुरू आहे.
उत्सवा दरम्यान सालाबादा प्रमाणे समारे दोन ते ३ लाख भाविक सत्संग व महाप्रसादाचा विविध सत्संग मंडळांना संत प्रभावती माई संत प्रेमानंद महाराज संत चांगदेव महाराज, संत सूर्यानंद महाराज तसेच सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी भेटी देवून भिक्षाफेरीचे माध्यमातून गहू, तांदुळ, गोडेतेल मसाले इ. शिधा महाप्रसादासाठी भाविकांनी अर्पण केल्याची माहिती आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे सदस्य संत विवेकानंद महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली – महाप्रसाद व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी आश्रमाचे विश्वस्त प्रकाश भट, बाळासाहेब गोरडे, प्रकाश गिरमे, विठ्ठलराव होन हे पाहत आहेत. उत्सवा दरम्यान अखंड अन्नछत्रा बद्दल माहिती देताना आश्रमचे विश्वस्त व भोजनालय समितीचे प्रमूख प्रकाश भट यांनी सांगितले.
*चौकट*
प्रसादालय समितीच्या वतीने उत्सव काळात भाविकांसाठी अहोरात्र महाप्रसाद व्यवस्था सुरू रहाणार आहे.भाविकांसाठी महाप्रसादामध्ये पुरी चपाती वेगवेगळ्या भाज्या, भाताचे विविध प्रकार आमटी, जिलेबी चे मिष्ठान्न दिले जाणार आहे, तसेच पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गुरूपौर्णिमा यशस्वीतेसाठी आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे सर्व संतगण व आश्रम चे सर्व विश्वस्त, सर्व सेवकवृंद व ग्रामस्थ यांचे प्रयत्न या प्रतिपूर्ती होत आहे.
कोकमठाण गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य तसेच पंचक्रोशीतील सर्व स्थानिक मंडळीचे सहकार्य मिळत आहे.
Post Views:
90