अजितदादांना पाठिंबा  मात्र  शरद पवारांचा आशीर्वादही कायम – आशुतोष काळे 

अजितदादांना पाठिंबा  मात्र  शरद पवारांचा आशीर्वादही कायम – आशुतोष काळे 

Ajit Dada’s support but Sharad Pawar’s blessings remain – Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun16 July24,16.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : अजित दादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवार साहेबांना सुद्धा भेटलो. साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं, रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला असल्याचे आ  काळे  यांनी  सांगितले. 

 महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै रोजी राजकीय भूकंप झाला शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली राज्यात ही उलथा पालथ सुरू असताना कोपरगावचे आमदार आशुतोष काळे परदेश दौऱ्यावर होते. बुधवारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन पाठिंबा देत त्यांच्या  गोटात दाखल झाले. शरद पवार कर्मवीर शंकरराव काळे व रयत शिक्षण संस्था असा तीन पिढ्यांचा संबंध पाहता  आमदार आशुतोष काळे यांची भूमिका हा शरद पवारांना मोठा झटका होता.परंतु थेट भेट झाली नसल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती त्यामुळे ही संभ्रमावस्‍ता होती. 
शनिवारी सायंकाळी कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर  प्रसारमाध्यमांशी आपण घेतलेल्या भूमिकेबाबत खुलासा करताना  आ आशुतोष काळे यांनी  परदेशात असताना अजित पवारांचा  फोन आला होता. कुठे आहे? विचारलं मी त्यांना सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे एवढेच त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मिडियावर राज्यातील घडामोडी समजल्या. परदेशात जाण्यापूर्वी असं काही घडेल याची कल्पना सुद्धा नव्हती, ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, यावर अनेकांचा विश्वास अद्यापही बसलेला नाही. अशी  प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे  यांनी दिली  आहे. 
दरम्यान परदेशातून आल्यानंतर अजितदादांना भेटलो. मतदार संघातील विकास काम मार्गी लागतील, असा आश्वासन दादांनी या यावेळी दिले. महाविकास आघाडीच्या काळातही दादांनी मला मदत केली होती. एवढं बोललो आणि त्या ठिकाणाहून अजित दादांना पाठिंबा देऊन मतदारसंघात आलो. 

कोट

 काळे आणि  पवार कुटुंब आज एकत्र आहे, वैचारिकदृष्ट्या दोन वेगळ्या भूमिका मात्र भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एक परिवार म्हणूनच समोर येईल, याची मला खात्री वाटते. पवार साहेबांना मानणारे आम्ही कार्यकर्ते असून वैचारिक दृष्ट्या सुद्धा एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. – आ आशुतोष काळे 

Leave a Reply

You cannot copy content of this page