कोपरगाव : राष्ट्रवादी काळेच्या पाठींब्यानं वाढवलं भाजपच्या कोल्हेंच टेन्शन; नव्या समीकरणाने चिंता

कोपरगाव : राष्ट्रवादी काळेच्या पाठींब्यानं वाढवलं भाजपच्या कोल्हेंच टेन्शन; नव्या समीकरणाने चिंता

Kopargaon: The support of NCP Kale increased the tension in BJP’s neck; Anxiety with the new equation

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon17 July24,13.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : राज्यात शिंदे व फडणवीस सरकार संपूर्ण बहुमतात असतानाही अजित पवार यांचा मोठा गट सत्तेत समाविष्ट करून घेण्यात आला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याची घोषणाही केली. त्यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप करण्याचे गणित कसे जुळविणार, असे टेन्शन सध्या दोन्ही पक्षांच्या समर्थकांना लागले आहे.

 

तर, कोपरगाव विधानसभेची जागा कोण लढविणार हा सर्वात कळीचा मुद्दा असणार आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे कोपरगावातुन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांना पराभूत करून विजयी झालेले आहेत. एकत्र निवडणुका लढवायच्या तर कोपरगावातुन लढणार कोण, हाच मोठा प्रश्न असणार आहे. परदेश दौऱ्यावर आल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी ना अजित पवार यांना पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाले. या नव्या समीकरणामुळे चिंता वाढली आहे
वास्तविक विधानसभेत भाजप व शिवसेनेचे संपूर्ण बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना सत्तेत स्थान देण्यात आले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून मोदींच्या पंतप्रधानपदासाठी अधिकाधिक खासदार विजयी व्हावेत, या गणितामुळे हे नवे राजकीय समीकरण उदयास आले. परंतु, या समीकरणामुळे २०२४ च्या विधानसभेतील कोपरगावचे समीकरण चांगलेच बिघडण्याचा अंदाज आहे.

प्रथमत: कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप हे दोन्हीही मोठे पक्ष आहेत. आता दोघेही सत्तेत सोबत आणि आगामी निवडणुकीत तिघे (शिंदे शिवसेनेसह) एकत्र लढणार म्हणल्यास या जागेची वाटणी करायची कशी असा यक्षप्रश्न आहे.राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या वाटण्या झाल्या तर शिवसेनेच्या पदरात कोणती जागा टाकायची असाही प्रश्न आहे. अगोदर वाटपातील आकड्यांचे गणित सुटले तरी मतदार संघाचे गणित सुटणे फारच कठीण आहे.कारण, अजित पवार यांच्या गटाकडून आमदार आशुतोष काळे हे कोपरगाव मतदार संघातून विजयी झालेले आहेत. तर, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचा देखील हाच मतदार संघ आहे. मग, आता नेमकी कोणत्या पक्षाला ही जागा सुटणार व कोण ही निवडणूक लढविणार असा प्रश्न आहे.

 

शिवसेना भाजप युतीत कोपरगाव विधानसभेची जागा शिवसेनेकडे असायची सन १९९४ रावसाहेब सोनवणे (शिवसेना) सन १९९९ नामदेवराव परजणे (शिवसेना), सन २००४ अशोक काळे (शिवसेना), सन २००९ अशोक काळे (शिवसेना),असे दोन वेळा शिवसेना आमदार म्हणून अशोक काळे निवडून आले,त्यानंतर सन २०१४ ची पहिली विधानसभा निवडणूक आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढविली त्यावेळेस कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली व सौ. स्नेहलता कोल्हे बीजेपीच्या तिकिटावर निवडून आल्या, नंतर आशुतोष काळे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी भाजपाने ही जागा शिवसेनेकडून आपल्या पदरात पाडून घेतली होती. त्यामुळे सन २०१९ च्या निवडणुकीत स्नेहलता कोल्हे भाजपच्या तिकिटावर उभ्या राहिल्या तर आशुतोष काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकिटावर निवडून आले
विशेष म्हणजे कोपरगाव व शिर्डी विधानसभा या दोन्ही जागा शिवसेनेला गमवाव्या लागल्या बदल्यात शिवसेनेला जिल्ह्यात कुठलीही जागा दिली नव्हती.

आता आशुतोष काळे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेतच. तर भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऋणानुबंध देखील अगदी निकटचे आहेत. त्यामुळे ही जागा त्यांनाच मिळेल, असा दावा त्यांच्या समर्थकांचा आहे. मग, आशुतोष काळे यांचे काय, असा प्रश्न आहे.जर, कोपरगावची जागा भाजपला सुटणार नसेल तर स्नेहलता कोल्हे विधानसभा लढतील का, असाही प्रश्न आहे. मात्र, या अदलाबदलीमुळे मग काळे कोल्हे यांचे काय, असाही प्रश्न आहे.

दरम्यान, सद्यःस्थितीत तरी आमदारांची जागा आमदारांना या तत्त्वाने या आमदार आशुतोष काळे यांनी शनिवारी तिकीट मलाच मिळणार असा दावा प्रसारमाध्यमांसमोर करून खळबळ उडवून दिली आहे.
भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे गेल्या पाच वर्षापासून तळागाळात पोचून भाजपाचे कार्य करीत आहे त्यांची येणाऱ्या कोपरगाव विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी आहे.आशुतोष काळे सध्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत असून आगामी निवडणुकीसाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे.

कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप दोन्ही पक्ष राजकीय ताकद बाळगून आहेत यात दुमत नाही.राज्यात सत्तेत नसले तरी कोपरगावात ठाकरे सेनेची निर्णायक ताकद सुद्धा नाकारता येणार नाही.आता कोपरगाव विधानसभेच्या एका जागेची काळे कोल्हे कशी वाटणी करतात? मग शिवसेनेला काय, असा प्रश्न आहेच.कोपरगावात शिंदे सेनेच्या मानाने राष्ट्रीय काँग्रेसचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. या सर्वांचा विचार करता आता कोपरगावात आणखी नवे काही समीकरण उभारणार हेही पाहावे लागेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page