कोपरगावच्या रस्त्यांसाठी २५ कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे
25 crore fund approved for roads of Kopargaon – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon17 July24,18.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मतदार संघातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून विविध रस्त्यांसाठी पुरवणी अर्थ संकल्पात २५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
मतदार संघाच्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांचा प्रश्न सोडवून नागरिकांना खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता केली आहे. उर्वरित रस्त्यांसाठी केलेल्या त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती सरकारने राज्य मार्ग ७ धामोरी, रवंदे, ब्राह्मणगाव, येसगाव, करंजी पढेगाव, दहेगाव बोलका, धोत्रे, खोपडी जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ४ झेड कॉर्नर ते गाडे वस्ती (०३ कोटी), धारणगाव, कुंभारी, माहेगाव देशमुख, सुरेगाव, राज्य मार्ग ७ रस्ता प्रजिमा ८५ सुरेगाव ते तालुका हद्द (२.५० कोटी), रवंदे, टाकळी, पवार गिरणी , संवत्सर, भोजडे, जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ५ टाकली ते देवकर पंप (०३ कोटी), गोदावरी वसाहत, रुई, कोहकी ते राज्य मार्ग ३६ रस्ता प्रजिमा ९१ (२.५० कोटी), प्रजिमा ४ ते ब्राह्मणगाव, टाकळी, कोपरगाव, कोकमठाण, सडे, शिंगवे, रस्ता प्रजिमा ९९ ब्राम्हणगाव ते कोपरगाव (०४ कोटी), कोपरगाव, धारणगाव, सोनारी, चास, वडगाव, बक्तरपुर, जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ८ मायगाव देवी ते मंजूर (०५ कोटी), प्रजिमा ०४ ते ब्राह्मणगाव, टाकळी, कोपरगाव, कोकमठाण, सडे, शिंगवे, रस्ता प्रजिमा ९९ कोकमठाण ते सडे (०४ कोटी), राज्यमार्ग ०७ धामोरी, रवंदे, ब्राम्हणगाव, येसगाव, करंजी, पढेगाव, दहेगाव बोलका, धोत्रे, खोपडी जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा ४ धोत्रे ते तालुका हद्द (१ कोटी) असा २५ कोटी दिल्यामुळे महत्वाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे.