कोपरगावात सकल हिंदू समाजाचा विराट जनआक्रोश मोर्चा : लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी, सर्व पक्षाचा  सहभाग

कोपरगावात सकल हिंदू समाजाचा विराट जनआक्रोश मोर्चा : लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी, सर्व पक्षाचा  सहभाग

Massive public outcry march of the entire Hindu community in Kopargaon: demand for implementation of love jihad and anti-conversion law, participation of all parties

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu20July24,19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगावातील सकल हिंदू समाजाने २० जुलै रोजी सकाळी १० वाजता भगव्या ध्वजाची पूजा संत महात्म्यांच्या हस्ते  करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा ४ किमी अंतर असलेला ऐतिहासिक विराट जन आक्रोश मोर्चा काढला.मोर्चाला कोपरगाव शहरासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. 

संत मंडळी व्यासपीठावर समोर भगवा जनसमुदाय
हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाने कोपरगाव शहराचे वातावरण ‘भगवेमय’ झाले होते. आज पुकारण्यात आलेल्या ‘कोपरगाव बंद’ला नागरिकांनी १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, अशी लोकांची मागणी आहे.राजकीय पक्ष विरहित   हिंदू संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या. 
मोर्चापूर्वी उत्साही जमलेला भगवा जनसमुदाय
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा सावरकर चौक, कन्या विद्या मंदिर, गांधीनगर, श्रीराम मंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, धारणगाव रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मार्गाने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे    येऊन धडकला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
या मोर्चाला मार्गदर्शन करताना  प्रमुख वक्ते धर्मयोध्दा  सुरेश चव्हाणके यांनी पहिली मागणी लव्ह जिहाद विरुद्ध कायदा, दुसरी मागणी लँड जिहाद विरुद्ध कारवाई, तिसरी मागणी हिंदु राष्ट्र,चौथी मागणी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण थांबवा,पाचवी मागणी अवैध इस्लामिक धार्मिक स्थळांवर जिहाद्यांना मदत करणाऱ्या वर आर्थिक बहिष्कार टाका, मदरसे बंद करा, गड किल्ल्यावरील अवैध बांधकामे पाडा, कोपरगाव शहरातील बेकायदा बांधकामे पाडा, गोहत्या बंदी कायदा अधिक कठोर  करा, टिपू सुलतान व औरंगजेबाची जयंती बंद करा, अल्पसंख्यांक मंत्रालयाला टाळा लावा, हम दो हमारे दो सबके दो जनसंख्या नियंत्रण कायदा झाला पाहिजे, ड्रेस कोड लागू करा, लव जिहाद खटला  फास्टट्रॅक कोर्टात चालून 30 दिवसात न्याय द्या अशा मागण्या केल्या कोणत्याही पक्षात रहा पण हिंदू म्हणून रहा जातीयवाद सोडा जातीपेक्षा धर्म मोठा आहे पोलिसांनी योग्य न्याय दिला तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची व मोर्चे काढण्याची गरज पडणार  नाही असे अनेक मुद्द्यावर त्यांनी हिंदूंचे सुद्धा प्रबोधन केले
यावेळी हर्षदा ठाकूर म्हणाल्या  कुंभकर्णानंतर या देशातला हिंदू झोपला आहे, आपल्या मुळीबाळींना पळवले जात आहे त्यांचे धर्मांतर केले जात आहे आपण काय गप्प बसायचे का? आता चालणार नाही ईट का जवाब पत्थर से द्यावा लागेल  
सागर बेग म्हणाले पोलिसांनी जर आम्हाला योग्य न्याय दिला तर रस्त्यावर उतरण्याची गरज पडणार नाही गोवंश हत्या कायदा आहे पण त्याचे योग्य पालन होते का घराघरात कसाई खाने चालविले जातात याला आळा घालणार आहेत की नाही ? नगर जिल्ह्याला जिहादींचा  विळखा का पडला आहे याची चौकशी करा तुमच्याकडील दंड्याचा उपयोग करा पोपट बोलू लागतील असेही ते म्हणाले  
 उशिरा आलेल्या श्वेता शिंदे यांनीही मोर्चाला मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संतोष गंगवाल यांनी केले
 रमेशगिरी महाराज शिवानंद गिरी महाराज उंडे महाराज आदी संत व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पुष्पाताई काळे काका कोयटे विजय वहाडणे राजेंद्र झावरे कैलास जाधव, प्रमोद लबडे,कलविंदर दडियाल, सुनील गंगुले दत्ता काले, सनी वाघ, विनायक गायकवाड,  बाळासाहेब जाधव, अशोक लकारे, अनिल गायकवाड, सुनील फंड, स्वप्निल निखाडे, विनोद राक्षे, योगेश बागुल, बबलू वाणी, सचिन गवारे, मंदार  पहाडे, चेतन खुबानी, जितेंद्र रणशुर,राजेंद्र सोनवणे, सुभाष दवंगे , प्रफुल्ल शिंगाडे, विजय वाजे, सुनील शिलेदार,  यासह विविध पक्षांचे पदाधिकारी हजर होते कृती समितीने मोर्चाचे आयोजना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केल्यामुळे मोर्चा व्यवस्थित वेळेवर  पार पडला.
मागण्यांचे  प्रांतअधिकारी माणिक आहेर व
तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले
जन आक्रोश मोर्चा’बाबत आयोजक आणि प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे कुठलेही गालबोट न लागता मोर्चा शांततेत पार पडला. कोपरगाव च्या  पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

चौकट

कोपरगाव मध्ये गुरूवारी जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शहरभर भगवी वावटळ सळसळता हिंदू जनसागर उसळला होता शहरातील विविध रस्त्यावरून येणारी छत्रपती शिवाजी  चौकातील व्यासपीठाकडे येणा-या हिंदू प्रेमी बांधवांची व महिला गर्दी पाहून भगव्या धारा वाहत असल्याचा भास होत होता मोर्चाचे पहिले टोक ते शेपूट अंतर ४ ते ५ किमी  होते. तितकेच लोक सभेच्या ठिकाणावर बसलेले उभे होते हा कोपरगाव शहरातील गर्दीचा उच्चांकच म्हणावा लागेल

Leave a Reply

You cannot copy content of this page