५० हजाराचे अनुदानासाठी शेतकरी संतप्त,  प्रशासनाला दिले निवेदन 

५० हजाराचे अनुदानासाठी शेतकरी संतप्त,  प्रशासनाला दिले निवेदन 

Farmers angry for subsidy of 50 thousand, statement given to the administration

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir4Aug24,18.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शासनाच्या निर्णयाप्रमाणे देर्डे कोऱ्हाळेतील नियमित कर्ज परतफेड करणारे अनेक शेतकरी ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.त्यातच प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत.

राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, घोषणा करूनदेखील नियमित कर्जफेड करणारे देर्डे को-हाळे येथील अनेक शेतकरी अद्यापही ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. या शेतकऱ्यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे  यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन दिले.
या निवेदनावर प्रदीप  येवले, सिंधु  गवळी, अरुणराव  गवळी, नितीन  गवळी, प्रभाकर  डुबे, सत्यभामा  येवले, धनेश  गवळी, गणेश  गवळी, उषा गवळी, छबुबाई  गवळी, प्रसाद  गवळी, त्र्यंबक  पवार, संजय  शिलेदार, शारदा  डुबे, कार्तिक  येवले, शुभम  येवले, प्रियांका  येवले आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 देर्डे कोऱ्हाळे येथील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या व शासकीय अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने शासनाच्या धोरणानुसार अनुदान वाटप करण्याची सूचना स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांनी तहसीलदारांना केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page