विवेक कोल्हे यांच्या ग्रामीण  विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याच्या सूचना

विवेक कोल्हे यांच्या ग्रामीण  विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्याच्या सूचना

Vivek Kolhe’s suggestion to start buses for rural students

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu10Aug24,18.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव-  तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील शेकडो विद्यार्थी कोपरगाव शहरातील रयत शिक्षण संस्थेचे के. बी. पी. विद्यालय व इतर शाळा, एस. एस. जी. एम. महाविद्यालय तसेच के. जे. सोमैय्या महाविद्यालय, संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, एम. बी. ए. महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर विविध नामांकित शैक्षणिक संस्था मध्ये शिक्षण घेण्यासाठी दररोज येत असतात

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव कोळपेवाडी ब्राह्मणगाव टाकळी खोपडी, धोत्रे, भोजडे  या परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कोपरगाव येथे  शिक्षणासाठी जात येत असतात . परंतु विद्यालयाच्या वेळेत व विद्यालय सुटल्यानंतर एस. टी. महामंडळाची बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या तासिका बुडतात व शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांचे बस अभावी हाल सुरू होते. बस अभावी होणाऱ्या गैरसोयीबद्दल विद्यार्थ्यांनी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे  यांना गुरुवारी (१० ऑगस्ट) भेटून अतोनात हाल होत असल्याची  आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली.  विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने विवेक कोल्हे यांनी  कोपरगाव एसटी आगार प्रमुख अमोल बनकर या अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ कोपरगाव आगाराच्या वतीने विद्यार्थी व प्रवाशांच्या मागणीप्रमाणे नियमित व वेळेवर पुरेशा प्रमाणात एस. टी.  बस सुरू करण्याबाबत सूचना केल्या आहेत. 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात परंतु  बस अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विवेक कोल्हे यांनी दखल घेऊन सूचना केल्यामुळे प्रश्न मार्गी लागणार गैरसोय दूर होणार म्हणून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी विवेक कोल्हे यांचे  यांचे आभार मानले आहे 
तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व विविध मागण्यांबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक बनकर यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले
याप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक स्वराज सूर्यवंशी, शैलेश नागरे, सुदर्शन थोरे, कृष्णा जगताप, (खोपडी), विश्वजित चव्हाण (धोत्रे), पवन सिनगर, आलिम शेख (भोजडे), सौरभ रोकडे, शुभांगी मनचरे, पूजा जेऊघाले आदी विद्यार्थी व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page