एक देश, एक निवडणूक” करताय तर मग सर्वांच्या निवडीसाठी माझे एकच मत का नको ?

“एक देश, एक निवडणूक” करताय तर मग सर्वांच्या निवडीसाठी माझे एकच मत का नको ?

If doing “one country, one election” then why don’t I have one vote for everyone’s choice?

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 1Sep24,30.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोणत्याही निवडणुकीच्या प्रक्रियेला किमान दीड महिना लागतो.वारंवार होणाऱ्या निवडणुका विकासाच्या कामात अडथळा ठरतात.आणि या काळात विकासाचा वेग मंदावतो म्हणून एक देश एक निवडणूक ही आजच्या काळाची गरज आहे, एक देश एक निवडणूक करताय तर मग सर्वांच्या निवडीसाठी माझे एकच मत का नको ? असा सवाल आता जाणकार मंडळी करत आहेत.

या मंडळींचे असे म्हणणे आहे की, आज मी निवडून दिलेला आमदार असो की खासदार मला हव्या असलेल्या मुख्यमंत्र्याला, मला हव्या असलेल्या पंतप्रधानाला मला हव्या असलेल्या राष्ट्रपतीला निवडून देईलच याची शाश्वती नाही त्यावेळेस तो त्याच्या स्वतःच्या अडचणी व लाभाचा विचार करतो त्याच्यापुढे मतदारांचा विचार नसतो ही एक प्रकारे मतदारांची फसवणूकच आहे. त्यात सध्याचे राजकारण पाहता फोडाफोडीचे राजकारण खोक्याचे राजकारण नीतिमत्ता नैतिकता घसरलेले राजकारण, घोटाळ्याचे बाहेर येणारे आकडे ईडीचा ससेमिरा भय पक्षांतरानंतर होणारे शुद्धीकरण प्रसार माध्यमावर होणारी शाब्दिक चिखलफेक या सर्वामुळे नेते असो की पक्ष सर्वांची पक्षनिष्ठा व पक्षाची नीती मूल्यं या सर्वांचे अवमूल्यन झाले आहे  मान वाचविण्यासाठी तडजोडीचे राजकारण सुरू असून टोकाच्या वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक एकत्र येऊन केवळ सत्तेचे सुकाणू हाकत आहेत यात त्यात प्रत्येकाचे  अजंठा वेगळा मतदार वेगळा त्यामुळे  श्रेय वादासाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसून येतात यात जनतेचे कुठलेही भले होत नाही तर या उलट थोर पुरुषांच्या विचारांना तिलांजली दिल्याचे दिसून येते एकेका पक्षाचे दोन दोन पक्ष झाले दुसरीकडे वर्षानुवर्ष भांडलो, झगडलो आता मनाविरुद्ध त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची पाळी आल्याने स्थानिक पातळीवर निष्ठावान कार्यकर्त्यांचे भजे झाल्याचे पहावयास मिळते. तर वेगवेगळे पक्ष एकत्र आल्याने स्थानिक उमेदवारांची सुद्धा मोठी अडचण झाली आहे  ज्या पक्षासाठी वर्षानुवर्ष सर्व सोडून तळागाळात जाऊन पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली वर्षानुवर्ष मतदारसंघासाठी केलेल्या कामाला न्याय मिळेलच तिकीट मिळेलच याची शाश्वती राहिली नाही सर्वकाही अस्थिर बेभरवंशाचे झाले आहे नेत्याबरोबर कार्यकर्त्यांची देखील  फरफट होत आहे या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सर्वसामान्य मतदारांच्या मनात राजकारणाविषयी घृणा तिरस्कार निर्माण झाल्यास नवल वाटायला नको परिणामत: आज पक्ष व नेत्याविषयी असलेली आपुलकी प्रेम पक्षावरील निष्ठा या सर्वांचे अध:पतन झाले आहे. राजकारणाचेच व्यापारीकरण झाले आहे

एका वर्गाचे असे म्हणणे आहे की आपल्या देशातील लोकशाही आणि संविधान जगात सर्वोच्च आहे परंतु निवडणुकीत मतदान करणारा मतदार हा सुमारे ५० ते ५५ टक्के अशिक्षित आहे उर्वरित ३८ ते ४० टक्के सुशिक्षित लोकांपैकी केवळ १८ ते २० टक्केच लोक मतदान करतात त्यामुळे इच्छा असूनही योग्य व्यक्ती निवडूनच येईल याची शाश्वती नसते आणि असे अनेकदा असे घडले देखील आहे त्यानंतर निवडून आलेल्या पक्षाचे नेते सत्तेसाठी त्यांना हवे असलेल्या व सोयीच्या उमेदवाराला मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणून निवडून देतात यासाठी कधी कधी पक्ष व पक्षांचे नेत्यांची या ना त्या कारणाने मुस्कटदाबी केली जाते. यावेळी पक्षाच्या निवडणूक निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना देखील विचारात घेतले जात नाही त्यात जे काही हुशार प्रबळ नेते असतील त्यांना मंत्रिपद किंवा महामंडळ अशा ठिकाणी वर्णी लावून गप्प केले जाते, सध्याच्या लोकशाहीमुळे घराणेशाही व राजकारणातील मक्तेदारी फोफावली असल्याचे दिसून येते त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता असो की मतदार  त्यांच्या मताला काडीची किंमतही राहिली नाही हे सत्य आहे

म्हणजे लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी लोकांच्या मनाप्रमाणेच मुख्यमंत्री, पंतप्रधान व राष्ट्रपती यांना मतदान करेलच असे नाही त्यामुळे एक राष्ट्र एक निवडणूक करताच आहात तर मग माझे एकच मत हा सुद्धा कायदा करावा म्हणजे मला माझा सरपंच, माझा नगराध्यक्ष, माझा महापौर या धर्तीवर  माझा मुख्यमंत्री माझा पंतप्रधान माझा राष्ट्रपती निवडून देण्याचे समाधान मिळेल. विशेष म्हणजे या पदावर पोहोचलेल्या व्यक्ती खऱ्या अर्थाने लोकमान्य होईल त्या व्यक्तीला पाच वर्ष कुठल्याही दडपणाविना काम करता येईल मग कोणताही निर्णय घ्यायचा असेल त्यासाठी बहुमताने ठराव मंजूर करावा लागेल म्हणजे कोणाच्या मनमानीला येथे अपसुक लगाम लागेल हुकूमशाहीचा प्रश्न येणारच नाही मात्र यामुळे घोडेबाजार थांबेल, फोडाफोडीचे राजकारण थांबेल भले मग मुख्यमंत्री, पंतप्रधान , व राष्ट्रपती या उच्चपदस्थ निवडणुकीसाठी उभे राहणाऱ्या उमेदवाराला गुणवत्तेचे निकष लावावेत सर्वांच्या निवडीसाठी माझे एकच मत असे झाले तर खऱ्या अर्थाने खालपासून वरपर्यंत राबविलेल्या प्रक्रियेला सुदृढ व संपन्न अशी संपूर्ण लोकशाही म्हणता येईल असेही मला वाटते 

चौकट

माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी वन नेशन-वन इलेक्शनबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी वन नेशन वन इलेक्शन ही काळाची गरज असल्याचे सांगून सांगितले की, वारंवार होणाऱ्या निवडणुका विकासाच्या कामात अडथळा ठरतात. ते म्हणाले की, निवडणुकीच्या प्रक्रियेला किमान दीड महिना लागतो. आणि या काळात विकासाचा वेग मंदावतो. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा व इतर निवडणुका एकाच वेळी घेणे आवश्यक आहे. एकाच वेळी सर्व निवडणुका घेताना ज्याप्रमाणे सरपंच नगराध्यक्ष व महापौर थेट जनतेतून निवडला जातो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पंतप्रधान व राष्ट्रपती देखील थेट जनतेतून निवडण्यात यावा, याचा अर्थ माझा सरपंच, माझा नगराध्यक्ष, माझा महापौर, माझा मुख्यमंत्री, माझा पंतप्रधान, माझा राष्ट्रपती हा थेट माझ्या मताने झाला पाहिजे थोडक्यात एक देश एक निवडणूक व एकच मत हा एक उत्तम उपक्रम आहे जो केवळ विकासासाठीच नाही तर लोकशाहीच्या समृद्धीसाठी आणि लोकशाहीच्या स्थिरतेसाठी एक स्तुत्य उपक्रम आहे. तसे झाल्यास मी त्याचे स्वागतच करीन.

Leave a Reply

You cannot copy content of this page