गौतम पब्लिक स्कूलमध्ये रक्षाबंधन साजरे
Gautam Public School celebrated Raksha Bandhan
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 30Aug24,30.20Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भावा-बहिणीचे पवित्र नाते अधोरेखित करणारा रक्षाबंधन सण देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत गौतम पब्लिक स्कूलमध्ये निवासी विद्यार्थ्यांसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, बीड, अहमदनगर, धुळे, जळगाव अशा विविध जिल्ह्यातून आलेल्या पालकांच्या समवेत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सचिव सौ.चैताली काळे यांनी पालक मेळाव्या निमित्त भेट देऊन विद्यार्थी व पालकांशी सवांद साधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकांनी शालेय व्यवस्थापन, मेस मधील जेवण व शैक्षणिक दर्जा याबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले.
यावेळी उपस्थित अनेक महिला पालकांनी प्राचार्य नुर शेख यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. यावेळी प्राचार्य नुर शेख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी आभासी दुनिया पासून दूर राहून आपली संस्कृती व परंपरा यांची जोपासना करावी. सदवर्तनी व नीतिमान नागरिक होण्यासाठी हे गुण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी संगितले. यावेळी पालकांचे प्रतिनिधी म्हणून बोलताना भोकरदन जालना येथील पालक विष्णू कळवत्रे यांनी पाल्यांच्या शैक्षणिक, क्रीडात्मक व निवासाच्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच दिंडोरी नाशिक येथील महिला पालक ज्योती पाटील यांनी सांगितले की, गौतम पब्लिक स्कूल मध्ये होणारे सर्वच बदल विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून शाळेचे व्यवस्थापन, प्राचार्य व शिक्षक प्रभावीपणे काम करत आहे. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी विविध गीते सादर करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा जाधव यांनी केले व आभार प्रकाश भुजबळ यांनी मानले.