इंद्राने हे बरोबर केले नाही; आपल्याही जीवनातशुक्राचार्य संजीवनी देतीलच – पंकजा मुंडे
Indra did not do it right; Shukracharya will give sanjeevani in our life too – Pankaja Munde
मुंडे यांनी घेतले कोपरगावात दत्तगुरु शुक्राचार्यांचे दर्शन Munde visited Dattaguru Shukracharya in Kopargaon
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 4Sep24,20.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : अमृत मंथनातील अमृत सर्व देवाच्या राजाने सर्व देवांनाच वाटले ते अमर झाले महादेव म्हणाले हे इंद्राने बरोबर केले नाही म्हणून त्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्यांना मेलेल्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनी मंत्र दिला आपल्याला ही जीवनात शुक्राचार्य संजीवनी देतीलच असा ठाम विश्वास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कोपरगाव येथे सोमवारी (दि४) रोजी शुक्राचार्य दर्शनानंतर छोटेखानी सभेत बोलताना व्यक्त केला
प्रारंभी शुक्राचार्य मंदिरात पंकजा मुंडे व माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या सह गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात मध्यान्ह आरती करण्यात आली .
आरती नंतर पंकजा मुंडे यांचे हस्ते गुरू शुक्राचार्य महाराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्या नंतर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे हस्ते सौ. पंकजा मुंडे व स्नेहलता कोल्हे यांचा यथोचित सत्कार केला. या वेळी सौ. पंकजा मुंडे यांनी आवर्जून मंदिराची माहिती घेत मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांना “शुक्र तीर्थ ” हे पुस्तक व महाराजांचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमासाठी पंच क्रोषितील भाविक माजी नगरसेविका विद्या सोनवणे, चांगदेव कातकडे, प्रसाद कातकडे, डॉ. अजेय गर्जे, अनिल आव्हाड सौ. पंकजा मुंडे यांचे हजारो समर्थक व पत्रकार उपस्थीत होते .
आज मी शुक्लेश्वर अर्थात महादेवांचे दर्शन घेतले महादेव भोळे आहे आराधना केली की ते भक्तांना वर देतात त्यामुळे ते कुणाला काय वर देतात याचे देवांना टेन्शन आले आहे मात्र मी प्रार्थना केली आहे की माझ्यावरील लोकांचे प्रेम राज्याच्या कोणत्याही प्रांतात असो, जळी स्थळी पाषाणी रात्र दिवस कुठेच कमी होऊ देऊ नको, माझ्याकडे भजन नाही की भोजन नाही दरवर्षी दसरा मेळाव्यात तरीही लोक येतातच मला कोणते पद नाही त्यामुळे माझ्याकडे मिशन नाही आणि कमिशन ही नाही, संघर्ष आपल्या वाटेला आला नाही पाहिजे असे काम आपल्याला करायचे आहे संघर्ष विश्वास ठेवा संयम ठेवा एवढंच सांगते तुमच्या सेवेसाठी श्वासात श्वास असेपर्यंत मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही राजकारणात हे व्रत राजकारण हे व्रत आहे या व्रतात काट्यावर चालणाऱ्यांची लोक कदर करतात कदर होते गालीच्या वर चालणाऱ्यांना पदावर विराजमान होता येते ज्याला संघर्षाने मिळते तोच नेता होऊ शकतो म्हणून हा संघर्ष आपल्याला स्वाभिमानी व रुबाबदार बनवतो याच स्वाभिमानी व रुबाबदारपणे मी शिवशक्ती परिक्रमाकडेच निघाली आहे मी शिव आणि शक्ती तुमच्याच पाहते तुमच्या डोळ्यात पाहते
सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, शिव आणि शक्ती जसे एकमेकांपासून भिन्न नाहीत तसेच मुंडे आणि लोक तुम्ही एकमेकापासून कधीही भिन्न करता येणार नाही जसा पराभव झाला तसे लोक साडेचार वर्षे मला ताई आमच्याकडे या इकडे या अनेकांचे सल्ले आणि सूचना ऐकल्यात भरपूर लेकरं पदराखाली असल्याने आई म्हणून संयम पाळला मला तुमच्या प्रेमाच्या सावलीपेक्षा मोठी सावलीच मिळू शकत नाही शिवशक्ती परिक्रमेचे माध्यमातून लोकांच्या भेटी घेण्यासाठी मी बाहेर पडले आहे. प्रत्येक ठिकाणी भव्य स्वागत केले गेले, यापेक्षा मोठे काय मिळायला हवे, लोक येतात, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. तो विश्वास कायम राहील, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदीर प्रमुख सचिन परदेशी, उप मंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे,ट्रस्टी हेमंत पटवर्धन व कमिटी मेंबर मधुकर साखरे , दिलीप सांगळे , विजय रोहोम , संजय वडांगळे , विलास आव्हाड , विलास आव्हाड , बाळासाहेब लकारे , विकास शर्मा , राजेंद्र आव्हाड , भागचंद रुईकर , सुभाष ढाकणे , विशाल राऊत , महेंद्र नाईकवाडे , डॉ अजय गर्जे , व बेट ग्रामस्थ , मंदिर पुजारी मान्यवर यावेळी उपस्थित होते
Post Views:
130